ठाणे

ठाणे : आज काही भागातील पाणीपुरवठा बंद

ठाणे महानगरपालिकेच्या मुख्य जलवाहिनीवर ९० फूट रस्त्यालगत कळवा टॅपिंगवरील एअर व्हॉल्व गळती होत असल्याने तातडीची दुरुस्ती करण्यात येणार आहे.

Swapnil S

ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या मुख्य जलवाहिनीवर ९० फूट रस्त्यालगत कळवा टॅपिंगवरील एअर व्हॉल्व गळती होत असल्याने तातडीची दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे गुरुवार, १६ जानेवारी रोजी स. ९ ते रा. ९ या काळात ठाणे शहर आणि कळवा, मुंब्रा येथील काही भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

जलवाहिनीवरील गळती रोखण्यासाठी महापालिकेच्या स्वत:च्या आणि स्टेम प्राधिकरणाच्या योजनेतील पाणी पुरवठ्यावर हा १२ तासांचा शटडाऊन घेण्यात येणार आहे. त्यामुळे, घोडबंदर रोड, लोकमान्य नगर, वर्तक नगर, साकेत, ऋतू पार्क, जेल, गांधी नगर, रुस्तमजी, सिद्धांचल, इंदिरानगर, रुपादेवी, श्रीनगर, समता नगर, सिद्धेश्वर, इंटरनिटी, जॉन्सन, मुंब्रा व कळव्याचा काही भाग येथे १२ तासांसाठी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील.

या कपातीच्या काळात पाणी काटकसरीने वापरून ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. ठाण्यात पाणीपुरवठा बंद करण्याचे सत्र सध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

मेट्रो-५च्या टेंडर, अलाइनमेंटला सुरुवात; उल्हासनगरच्या विकासाला मिळणार नवी दिशा

Mumbai : पुन्हा BEST चा अपघात! पवईत इलेक्ट्रिक बस दुभाजकावर आदळली; ७ प्रवासी जखमी, चालक म्हणाला- 'कारकडे लक्ष गेलं'

Palghar Rain Alert : पालघरला मुसळधार पावसाचा तडाखा! डहाणू-तलासरीत पूरस्थिती, रेल्वे सेवा ठप्प

Lonavala Viral Video : ट्रेकिंगदरम्यान थोडक्यात बचावला तरुण; पावसाळ्यात सुरक्षित ट्रेकसाठी घ्या 'ही' खबरदारी

Mumbai : "ड्रग्ज प्रकरणात अडकवून आयुष्य उद्ध्वस्त करेन"; आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना पोलिसाची धमकी, VIDEO व्हायरल