ठाणे

ठाणे : मैत्रिणीला वारंवार ब्लॅकमेल करणाऱ्याची तरुणाने केली हत्या

Swapnil S

ठाणे : मैत्रिणीला वारंवार ब्लॅकमेल करणाऱ्याला समजवण्यासाठी गेलेल्या तरुणात व ब्लॅकमेल करणाऱ्यामध्ये वाद झाल्याने तरुणाने कोयत्याने वार करून ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणाची हत्या केल्याची खळबळजनक घटना ठाण्यातील कोपरी भागात घडली आहे. या प्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी तरुणास पोलिसांनी अटक केली असून त्याच्या मैत्रिणीला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे अशी माहिती पोलिसांनी दिली.

ठाणे पूर्वेकडील कोपरी परिसरातील चेंदनी कोळीवाडा येथे राहणारी २० वर्षीय तरुणीची २८ एप्रिल रोजी एका लग्न समारंभात स्वयंम सतीश परांजपे या तरुणासोबत ओळख झाली होती. त्यानंतर या तरुणाने तरुणीस कारमध्ये बसवून फिरायला जावू असे सांगून, गुंगीचे औषध पाण्यामधे पाजून स्वतःच्या घरी घेऊन गेला होता. त्यावेळी त्याने सदर तरुणीचे आक्षेपार्ह फोटो काढले होते. याच फोटोच्या आधारे तो तरुणीस वारंवार त्रास देत होता. तसेच तू मला भेटायला ये असे मेसेज करून तिस कायम ब्लॅकमेल करत होता. याबाबत तरुणीने तिचा मित्र मयुरेश नंदकुमार धुमाळ (२४) यास सांगितली. त्यानंतर मयुरेश व तरुणी दोघेही शुक्रवारी सकाळी हे स्वयम् परांजपे यास तू तिचे काढलेले फोटो डिलीट कर असे समजून सांगण्यास गेले. यावेळी तेथे स्वयंम परांजपे व मयुरेश धुमाळ यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. या भांडणात मयुरेश धुमाळ याने स्वयंम यास कोयत्याने डोक्यावर वार करून त्याचा खून केला.

मविआचा तिढा सुटला! २६० जागांवर सहमती; २८ जागांवर रस्सीखेच; १-२ दिवसांत जागावाटप जाहीर होणार

पोलिसांवर हायकोर्ट संतापले; अतिरिक्त पोलीस आयुक्तांना हजर राहण्याचे आदेश

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; तिकीट आरक्षणाच्या नियमात बदल; १ नोव्हेंबरपासून होणार लागू

Maharastra Assembly Elections 2024: पक्षांतर्गत बंडाळीच्या धोक्यामुळे महायुती, मविआकडून सावध पवित्रा

नागरिकत्व कायद्यातील अनुच्छेद '६ए' वैध; सर्वोच्च न्यायालयाचा बहुमताने निर्वाळा