(संग्रहित छायाचित्र)
ठाणे

ठाण्यात फेरीवाल्यांची दादागिरी! कारवाईसाठी गेलेल्या सहाय्यक आयुक्तांनाच केली धक्काबुक्की; शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून आंदोलनाचा इशारा

फेरीवाल्यांनी थेट सहाय्यक आयुक्त अक्षय गुडधे यांना धक्काबुक्की केली. हे पाहून पालिकेच्या सुरक्षा रक्षकांनी गुडधे यांचा तात्काळ बचाव केल्याने मोठा अनर्थ टळला.

Swapnil S

ठाणे : फेरीवाल्यांची मुजोरी पुन्हा एकदा वाढली असून दिव्यात फेरीवाल्यांवर कारवाई करायला गेलेल्या ठाणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त अक्षय गुडधे यांना फेरीवाल्यांकडून धक्काबुकी झाल्याचा प्रकार घडला आहे. यासंदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असली तरी या प्रकारामुळे पुन्हा एकदा फेरीवाल्यांकडून दहशत पसरवण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला आहे. दुसरीकडे सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादानेच हा हल्ला झाला असल्याचा आरोप उबाठा पक्षाचे दिव्यातील पदाधिकारी रोहिदास मुंडे यांनी केला आहे. मुजोर फेरीवाले उठवले गेले नाहीत तर आंदोलन छेडण्याचा इशारा मुंडे यांनी पालिका प्रशासनाला दिला आहे.

दिवा रेल्वे स्थानक परिसर, मुंब्रादेवी कॉलनी भागात अनधिकृत फेरीवाल्यांचा उपद्रव वाढल्याने दिवा प्रभाग समितीच्या पथकाकडून कारवाई मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त अक्षय गुडधे यांच्या पथकाने फेरीवाल्यांवर कारवाई सुरू केली. यावेळी मुंब्रादेवी कॉलनी भागात फेरीवाल्यांनी हातगाड्या एका गाळ्यात नेत शटर बंद केले. त्यानंतर फेरीवाल्यांनी पालिका पथकाशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. हा प्रकार हातघाईवर आल्याने या फेरीवाल्यांनी थेट सहाय्यक आयुक्त अक्षय गुडधे यांना धक्काबुक्की केली. हे पाहून पालिकेच्या सुरक्षा रक्षकांनी गुडधे यांचा तात्काळ बचाव केल्याने मोठा अनर्थ टळला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पालिकेच्या पथकाची बाचाबाची करणाऱ्या फेरीवाल्यांना ताब्यात घेतले. या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार दाखक केली आहे.

दिव्यातील फेरीवाले हटवा म्हणून आम्ही वारंवार मागणी केली आहे. मात्र दिव्यातील फेरीवाले व आठवडे बाजार हटवले जात नाहीत. त्या अनुषंगाने सहाय्यक आयुक्त अक्षय गुडधे यांनी दिव्यातील फेरीवाल्यावर कारवाई करताना सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादाने त्यांच्यावर हल्ला झाला. फेरीवाल्यांवर व आठवडा बाजारावर कडक कारवाई करण्यात यावी, तसेच दिवा फेरीवालामुक्त करावा, अन्यथा ठाणे पालिका मुख्यालयासमोर आंदोलन केले जाईल. - रोहिदास मुंडे, शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) दिवा शहर संघटक

Ahilyanagar : राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे निधन

हर्बल हुक्क्याला कायदेशीर परवानगी; कायद्याच्या चौकटीत राहूनच न्यायालयाचे राज्य सरकारला कारवाईचे निर्देश

Bihar Assembly Elections 2025 : प्रशांत किशोर यांची माघार

ठाण्यात महायुतीला सुरुंग? भाजप-शिंदे सेनेचा ‘स्वबळावर’ लढण्याचा नारा, दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये वाकयुद्ध

मिशन ऑस्ट्रेलियासाठी तयारी सुरू! भारताचे सर्व खेळाडू पर्थ येथे दाखल; सरावानंतर रोहितची गंभीरसह दीर्घकाळ चर्चा