ठाणे

बदलापूर आंदोलन ही राजकीय स्टंटबाजी -कथोरे

बदलापूर येथील शाळेत दोन चिमुरड्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेने अवघ्या महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली असताना भाजप आमदार किसन कथोरे यांनी या प्रकरणी होणारे आंदोलन राजकीय स्टंटबाजी असल्याचा दावा केला आहे.

Swapnil S

मुंबई : बदलापूर येथील शाळेत दोन चिमुरड्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेने अवघ्या महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली असताना भाजप आमदार किसन कथोरे यांनी या प्रकरणी होणारे आंदोलन राजकीय स्टंटबाजी असल्याचा दावा केला आहे. लैंगिक अत्याचारप्रकरणी करण्यात येणारे आंदोलन राजकीय स्टंटबाजी आहे. हे आंदोलन करणारे आंदोलक बदलापूरचे नाहीत, असे त्यांनी म्हटले आहे.

किसन कथोरे म्हणाले की, “बदलापूरमधील आंदोलन आता भरटकले आहे. शाळा राहिली बाजूला आणि आंदोलक रेल्वेस्थानकात घुसले. रेल्वेत शिरलेले आरोपी बदलापूरचे नाहीत. सर्वजण बाहेरून आलेत. शाळेतील वातावरण आता शांत झाले आहे. शाळेच्या मुख्याध्यापिकेवर कारवाई झाली. कर्मचाऱ्यांवरही कारवाई झाली. संस्थाचालकाचीही चौकशी सुरू झाली आहे. या प्रकरणी शिक्षणाधिकाऱ्यांनी तातडीने चौकशीस सुरुवात केली. त्यानंतरही आंदोलन केले जात असल्याने ही राजकीय स्टंटबाजी असल्याचा वास येत आहे.”

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत