ठाणे

मलंगगड परिसरातील पाणी टंचाईचा प्रश्न कायमचा दूर होणार

जलसंपदा विभागामार्फत साडे सहा एमएलडी पाणी पुरवठा करण्याचे आदेशही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.

वृत्तसंस्था

कल्याण मलंगगड-कुशिवली धरणाचे काम वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जलसंपदा विभागाला दिले आहेत. या धरणाची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित असून ही मागणी तातडीने पूर्ण करण्याची मागणी कल्याण डोंबिवलीचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी केली होती. या १० एमएलडी क्षमतेचे धरण बांधून पूर्ण केल्यास त्या भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच, दिवा भागातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी जलसंपदा विभागामार्फत साडे सहा एमएलडी पाणी पुरवठा करण्याचे आदेशही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.

एमएमआर रिजन मधील पाणीपुरवठा प्रश्नावर सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष बैठक पार पडली. या बैठकीत कल्याण डोंबिवली मतदारसंघातील नागरिकांच्या पाणी प्रश्नाबाबत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आग्रही भूमिका मांडली. कल्याण मलंगगड-कुशिवली धरणाची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. मध्यंतरी हे काम सूरु होणार असतानाच जमीन अधिग्रहणाच्या बाबतीत घोटाळा उघडकीस आला होता. यातील दोषींवर कारवाई केल्यानंतर आता या धरणासाठी जमीन अधिग्रहण प्रक्रिया ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा सुरू केली आहे. ही प्रक्रिया वेगाने पूर्ण करून हे धरण लवकरात लवकर बांधून पूर्ण करावे असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत जलसंपदा विभागाला दिले आहेत.

१० एमएलडी क्षमतेचे हे छोटे धरण असून ते तयार झाल्यास या भागातील पाणी प्रश्न कायमचा दूर होऊ शकतो, त्यामुळे या धरणाचे काम तातडीने हाती घेण्याचे निर्देश या बैठकीत दिले आहेत. साडे सहा एमएलडी अतिरिक्त पाणी पुरवठ्यामुळे दिवा परिसराला एकूण ४१.५ एमएलडी पाणी मिळेल. त्यामुळे या भागातील पाणी टंचाई दूर होईल असा विश्वासही खासदार श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला.

Satyacha Morcha Mumbai : काढ रे तो पडदा! राज ठाकरे थेट पुरावा घेऊनच आले; म्हणाले, "त्यांना आधी बडवायचं मग...

Satyacha Morcha Mumbai : उद्धव ठाकरेंचे मतदारांना आवाहन; म्हणाले, "मतचोर जिथे दिसेल तिथे फटकवला...

पुण्यात पुन्हा टोळीयुद्ध पेटले? रिक्षाचालकाची भर रस्त्यात हत्या

मुंबईत राजकीय रणकंदन; विरोधकांच्या सत्याच्या मोर्चाला भाजपचे 'मूक आंदोलन' करून प्रत्युत्तर

Andhra Pradesh : एकादशीला भाविकांवर काळाचा घाला; वेंकटेश्वर मंदिरात चेंगराचेंगरी, ९ जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी