ठाणे

राज्य शासनाच्या शालेय अपघात विमा योजनेत आता दुपटीने वाढ

संदीप साळवे

जव्हार तालुक्यातील ग्रामीण तसेच शहरी भागामध्ये शिक्षणाचे महत्त्व लक्षात घेत पालक आपल्या मुलांना शिक्षण देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत, त्यातच राज्य शासनाच्या शालेय अपघात विमा योजना ही पूर्वी ७५ हजार रुपये मिळत असायचे, त्यात आता दुपटीने वाढ होऊन दीड लाख केले आहे.

राज्य शासनाने राजीव गांधी विद्यार्थी अपघात विमा योजनेत सुधारणा केली आहे. या सुधारणेनुसार मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना आता प्रत्येकी दीड लाख रुपये सानुग्रह अनुदान मिळणार आहे. विमा योजना इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यासाठी असून, यापूर्वी अपघाती मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबास ७५ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जात होती. दिवसेंदवस वाढलेली महागाई व विद्यार्थ्यांचे अपघाताचे वेगवेगळे स्वरूप या बाबींचा विचार करून शासनाने ही सुधारित योजना सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यामुळे मृत पाल्यांच्या पालकांना काही अंशी दिलासा मिळणार आहे.

शालेय विद्यार्थ्यांना अपघातामुळे पोहोचलेल्या नुकसानीची काही प्रमाणात भरपाई व सुरक्षा कवच देण्याच्या दृष्टीने राज्यातील पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यासाठी राजीव गांधी सुरक्षा योजना विमा कंपन्या मार्फत २००३ पासून राबविण्यात येत होती.

यासाठी विम्याचे हप्ते एकत्रितरीत्या शासनाकडून देण्यात येत होते. मात्र, विमा कंपन्या विविध कारणे सांगून विद्यार्थ्यांना भरपाई देण्याबाबत टाळाटाळ करीत होत्या. त्यामुळे संबंधित योजना बंद करून त्या ऐवजी सानुग्रह अनुदान योजना प्रायोगिक तत्वावर राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला.यामुळे बस चालकांचा गाडीवर ताबा राहील आणि मुल देखिल सुरक्षित राहतील या निर्णयामुळे पालकांमध्ये आनंद व्यक्त करण्यात आला आहे. तसेच शासनाच्या निर्णयाचे स्वागत देिखल करण्यात आले आहे.

राज्य शासनाने विद्यार्थी अपघात विमा रक्कम वाढविण्यासाठी सुधारणा केली असून, सानुग्रह अनुदान योजनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाचा हा उत्तम निर्णय असल्याचे म्हटले जात आहे.

या निर्णयानुसार दिनांक २१ जून पासून सुधारित योजना सुरू करण्यात आली आहे. अपघाती मृत्यू ओढावल्यास १ लाख ५० लाख रुपये, एक अवयव किवा एक हजार रुपये, कायमचे अपंगत्व आल्यास १ डोळा गमावल्यास ७५ हजार रुपये, अपघातामुळे शस्त्रक्रियेसाठी प्रत्यक्ष रुग्णालयाचा खर्च किवा कमाल १ लाख रुपये दिले जाणार आहेत.

छत्रपती संभाजीनगरमध्ये राडा, क्रांती चौकात शिंदे-ठाकरे गट आमनेसामने

"शरद पवारांना ऑफर नव्हती, तो सल्ला होता..." नरेंद्र मोदींच्या वक्तव्यावर फडणवीसांचं स्पष्टीकरण

माजी मंत्री सुरेश जैन यांचा राजकीय संन्यास, 'या' कारणामुळं घेतला निर्णय; "कोणालाही पाठिंबा नाही"

'आप'ला चिरडण्यासाठी मोदींचे प्रयत्न; काही दिवसांनी ममता,स्टॅलिन,उद्धवही तुरुंगात जातील: केजरीवालांचे गंभीर आरोप

...तेव्हा महाराष्ट्रद्रोही असल्याची लाज वाटली नाही का? संजय राऊतांच्या टीकेला मनसेचे प्रत्युत्तर