ठाणे

उल्हासनगरमध्ये एकाच दिवशी दोन शेजारील घरांमध्ये चोरी

उल्हासनगर-५ , येथील ३९ सेक्शन , गणेश नगर या परिसरात उल्हासाबाई मारुती भांगरे ( ८० ) ही वयोवृद्ध महिला राहते

प्रतिनिधी

गणेश नगर परिसरात रात्रीच्या सुमारास दोन शेजारील घरांमध्ये अज्ञात इसमाने चोरी करून रोख रक्कम व सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. या प्रकरणी हिल - लाईन पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उल्हासनगर-५ , येथील ३९ सेक्शन , गणेश नगर या परिसरात उल्हासाबाई मारुती भांगरे ( ८० ) ही वयोवृद्ध महिला राहते, काल दुपारी तिच्या नातेवाईकाकडे गेली होती, दरम्यान रात्रीच्या वेळेस अज्ञात इसमाने घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करून घरामध्ये ठेवलेले २ तोळे सोने व २५ हजार रुपये रोख रक्कम चोरी केली. याच परिसरात पापड विक्रीचा व्यवसाय करणारे व उल्हासाबाई यांच्या शेजारी राहणारे अशोक लक्ष्मण साळवे हे देखील एका कामानिमित्त त्यांच्या कुटुंबीयांसह बाहेर गेले होते. दरम्यान याच सुमारास अज्ञात इसमाने घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करून २ तोळे सोने आणि १२ हजार रुपये रोख रक्कम चोरी केली. दोन्ही घरात एकूण ७५ हजार रुपयांचा ऐवज चोरी झाल्यातचे पोलिसांनी नमूद केले आहे.

"ज्यांना स्वतःच्या आई-वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते..."; मीनाताईंच्या पुतळ्याची पाहणी केल्यानंतर उद्धव ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया

Mumbai : मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकल्याने शिवाजी पार्क परिसरात तणाव; ठाकरे गट संतप्त, पोलिसांनी बंदोबस्त वाढवला

Mumbai : २० सप्टेंबरपासून मोनोरेल अनिश्चित काळासाठी बंद; MMRDA चा निर्णय

जपानमधून ‘टायफून’ क्षेपणास्त्र हटवा! चीनची अमेरिकेकडे मागणी

राज्यातील सर्व न्यायालये कार्यरत आहेत का? खासदार, आमदारांविरोधातील खटल्यांबाबत हायकोर्टाने सरकारला फटकारले