ठाणे

यंदा ठाणे जिल्ह्याच्या १२ वीच्या निकालात घसरण

प्रतिनिधी

बुधवारी जाहीर झालेल्या १२ वी च्या निकालात ठाणे जिल्ह्याचा निकाल गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे ७ टक्क्यांनी घसरला आहे. गेल्या वर्षी जिल्ह्याचा एकूण निकाल ९९.८७ टक्के लागला होता तो यंदा ९२.६७ टक्के लागला आहे. यात सायन्स शाखेचे ९७.५१, कला शाखेचे ८५.९१ तर वाणिज्य शाखेचे सर्वाधिक ९१.७० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

गेल्या दोन वर्षाच्या कोरोनाकाळात बहुतांशीकाळ ऑनलाईन क्लासेसद्वारे विद्यार्थ्यांचे शिक्षण झाले तर यंदा काही काळ ऑनलाईन तर काही काळ ऑफलाईन शिक्षण झाले परीक्षा मात्र प्रत्यक्षपणे विद्याथ्यांर्ना द्याव्या लागल्या. मार्च महिन्यात झालेल्या परीक्षेस सायन्स शाखेचे १६ हजार ९६६ विद्यार्थी तर १३ हजार ५३६ विद्यार्थिनी परीक्षेला बसल्या होत्या त्यातील १६ हजार ५३६ विद्यार्थी आणि १३ हजार २०८ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. याचप्रकारे कला शाखेचे ८१.४२ टक्के विद्यार्थी आणि ८९.६९ टक्के विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. याच प्रकारे वाणिज्य शाखेचे ९०.६३ टक्के विद्यार्थी, ८९.६९ टक्के विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत.

कल्याण ग्रामीण ९५.८० टक्के, अंबरनाथ ८९.५२ टक्के, भिवंडी ग्रामीण ९३.९४ टक्के, मुरबाड ९२.३८ टक्के, शहापूर ९४.७५ टक्के, ठाणे पालिका परिसर ९१.०८ टक्के, नवी मुंबई पालिका परिसर ९४. ८६ टक्के, मिराभाईंदर पालिका परिसर ८९.४४ टक्के, कल्याण डोंबिवली ९२.७९ टक्के उल्हासनगर पालिका परिसर ९२.७५ टक्के तर भिवंडी पालिका परिसराचा निकाल ९४.७५ टक्के लागला आहे.

"तर पवारांची औलाद सांगायचो नाही..." उदयनराजेंच्या प्रचारसभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले?

Terrorist Attack in Jammu Kashmir: जम्मू-काश्मीरच्या पूंछमध्ये हवाई दलाच्या वाहनावर हल्ला; एक जवान शहीद, चार जखमी!

पश्चिम महाराष्ट्रात कोणाचा गुलाल? मतदारांमध्ये उत्सुकता, मुद्यांवरून गुद्यांवर चर्चा

World Laughter Day 2024: हसत राहा! हसल्याने आरोग्याला होतात अनेक फायदे

"अपना टाईम भी आयेगा" म्हणत बिचुकलेंनी सांगितले कल्याण मतदारसंघ निवडण्याचे कारण