ठाणे

एकाच घरात तीन मृतदेह आढळले

पालघर जिल्ह्यातील वाडामधील नेहरोली गावात एकाच घरातील तीन मृतदेह हे आढळल्याने खळबळ माजली आहे.

Swapnil S

वाडा : पालघर जिल्ह्यातील वाडामधील नेहरोली गावात एकाच घरातील तीन मृतदेह हे आढळल्याने खळबळ माजली आहे. एक मृतदेह घराच्या बाथरूम तर दोन मृतदेह हे एका पेटीत कुजलेल्या अवस्थेत मिळाल्याचे सांगितले जाते.

मूळचे गुजरातचे राठोड कुटुंब हे गेल्या पंचवीस वर्षांपासून नेहरोली गावात राहत होते. त्यांची दोन मुले ही कामानिमित्त बाहेर राहत असल्याने त्यातील गुजरात येथील एका मुलाचा आपल्या घरच्यांना फोन लागत नसल्याने तो नेहरोली येथे घरी आला, त्यानंतर ही घटना उघडकीस आली. या घटनेत मुकुंद बेचरदास राठोड (७६),पत्नी कांचन मुकुंद राठोड (७३), मुलगी संगीता मुकुंद राठोड (५१) अशी मयत व्यक्तींची नावे सांगण्यात येत आहेत.

आकड्यांच्या पलीकडे तथ्याचे आकलन

तब्बल १८ अब्ज डॉलर्सचा समझोता

जेवल्यानंतर लगेच आंघोळ करणं टाळावं का? जाणून घ्या

आजचे राशिभविष्य, १० सप्टेंबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Ganeshotsav 2026 : कानवल्याला मुरड घालता येत नाही? 'ही' सोपी ट्रिक वापरा, काठ दिसेल एकदम सुंदर