ठाणे

विनातिकीट प्रवाशांची रेल्वे प्रशासनाकडून धरपकड; कर्जत-खोपोली दरम्यान ४० हजारांचा दंड वसूल

नेरळ स्थानक ते खोपोली स्थानकादरम्यान विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई

Swapnil S

विजय मांडे/ कर्जत

नेरळ स्थानक ते खोपोली स्थानकादरम्यान विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर मध्य रेल्वेने कारवाई केली. वाणिज्य निरीक्षक शिरीष कांबळे यांनी यासाठी पुढाकार घेऊन सर्व तिकीट तपासणीसांच्या मदतीने मध्य रेल्वेच्या महसुलात भर टाकली.

सुमारे सरासरी २०० प्रवाशांकडून ४० हजार १०० रुपये दंड मध्य रेल्वे यांनी मुख्य वाणिज्य निरीक्षक शिरीष कांबळे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण तिकीट तपासणीस यांनी रेल्वे प्रशासनाकडे जमा केला तसेच सर्व स्थानिक पातळीवर विनातिकीट प्रवास करू नये, यासाठी आवर्जून सर्वांना संबोधन करण्यात आले. शिरीष कांबळे यांच्या प्रामाणिक कार्यासाठी अनेक स्थानिक पातळीवर प्रत्येक स्तरातून प्रशंसा करण्यात येत आहे. तसेच अशा प्रामाणिक प्रयत्नांसाठी प्रोत्साहन देण्यासाठी कौतुक देखील करण्यात येत आहे.

१३ नोव्हेंबर २०२४ रोजी लोणावळा विभागाचे मुख्य वाणिज्य निरीक्षक शिरीष कांबळे यांच्या सहकार्याने नेरळ ते खोपोली रेल्वे स्थानकांदरम्यान सकाळी ९ ते १२ वाजेदरम्यान तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली. सदर वेळी सुमारे १५१ विनातिकीट रेल्वे प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. १५१ विनातिकीट रेल्वे प्रवाशांकडून सुमारे ३४ हजार ९० रुपये दंड वसूल केला. सदर तिकीट तपासणी मोहीम प्रसंगी लोणावळा विभागाचे मुख्य वाणिज्य निरीक्षक शिरीष कांबळे, सहा. तिकीट तपासणीस, आरपीएफ व जीआरपी कर्मचारी उपस्थित होते.

विनातिकीट रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर दंडात्मक किंवा कायदेशीर कारवाई केली जाते. विनातिकीट प्रवास करून आपली तसेच आपल्या देशाची फसवणूक करू नका. योग्य तिकीट काढून आपला प्रवास सुनिश्चित व सुरक्षित करा. - शिरीष कांबळे, मुख्य वाणिज्य निरीक्षक

न्यायमूर्ती यशवंत वर्मा अडचणीत; जळीत नोटांप्रकरणातील आरोप सिद्ध, संसदीय चौकशी समितीचा अहवाल

SpiceJet Flight : टेकऑफच्या आधी विमानात असह्य उकाडा; श्वास घेण्यासही त्रास, प्रवाशांचा संताप, Video व्हायरल

Mumbai Crime : प्रेमविवाहानंतर ५ वर्षांत संसाराचा भयंकर शेवट! पत्नीच्या छातीत चाकू भोसकला, ४ वर्षांच्या मुलाला सोडून पती फरार

Gujarat : इमारतीच्या ३२व्या मजल्यावर क्रेनला लटकलेल्या अवस्थेत कामगाराचा मृतदेह; धक्कादायक घटनेचा VIDEO समोर

IndiGo विमानाचं इंजिन हवेतच बंद; २२४ प्रवाशांचा जीव टांगणीला, चेन्नई विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग