टिटवाळा स्थानकात १५ रात्रींचा पॉवर ब्लॉक; प्लॅटफॉर्म विस्तारीकरणासाठी लोकल प्रवाशांचे हाल 
ठाणे

टिटवाळा स्थानकात १५ रात्रींचा पॉवर ब्लॉक; प्लॅटफॉर्म विस्तारीकरणासाठी लोकल प्रवाशांचे हाल

मध्य रेल्वेच्या कसारा मार्गावरील टिटवाळा स्थानकात १५ डब्यांच्या लोकल गाड्यांसाठी प्लॅटफॉर्मचा विस्तार करण्यात येणार आहे.

Swapnil S

मुंबई : मध्य रेल्वेच्या कसारा मार्गावरील टिटवाळा स्थानकात १५ डब्यांच्या लोकल गाड्यांसाठी प्लॅटफॉर्मचा विस्तार करण्यात येणार आहे. या कामासाठी २८/२९ ऑगस्टच्या रात्रीपासून ११/१२ सप्टेंबरच्या रात्रीपर्यंत सलग १५ रात्री विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेतला जाणार आहे.

या कालावधीत अनेक लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून काही गाड्या अल्प अंतरावर थांबवण्यात येणार आहेत. ब्लॉकच्या पहिल्या टप्प्यात २८/२९ ऑगस्ट ते १/२ सप्टेंबरदरम्यान दररोज रात्री ११.३० ते पहाटे ५.१० वाजेपर्यंत कल्याण ते वासिंददरम्यान ५ तास ४० मिनिटांचा पॉवर ब्लॉक असेल.

पहिल्या टप्प्यातील ब्लॉकचा सर्वाधिक फटका टिटवाळा आणि कसारा दरम्यानच्या रात्रीच्या आणि पहाटेच्या लोकल फेऱ्यांना बसणार आहे. २८/२९ ऑगस्टच्या रात्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते टिटवाळा आणि कसारा जाणाऱ्या अनेक लोकल फेऱ्या रद्द राहतील. तसेच टिटवाळ्याहून सीएसएमटी आणि ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या सेवांवरही परिणाम होईल. रात्री ८.५६ वाजता सुटणारी सीएसएमटी-आसनगाव लोकल टिटवाळा येथेच थांबवली जाईल. तर रात्री १० च्या सुमारास सुटणाऱ्या डोंबिवली-सीएसएमटी आणि कल्याण-सीएसएमटी लोकल ठाणे स्थानकापर्यंतच चालवल्या जातील.

ब्लॉकपूर्वी कसारासाठी शेवटची लोकल सीएसएमटीवरून रात्री १०.४७ वाजता सुटेल, तर ब्लॉकनंतरची पहिली लोकल पहाटे ४.१९ वाजता सुटेल. कसारावरून सीएसएमटीसाठी पहिली लोकल पहाटे ३.५१ वाजता सुटेल. २९/३० ऑगस्ट ते १/२ सप्टेंबर दरम्यान टिटवाळा गाठणाऱ्या सर्व लोकल फेऱ्या आसनगावपर्यंत वाढवण्यात आल्या आहेत.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

UPI व्यवहारांवरील MDR शुल्काला तूर्तास ब्रेक! सणासुदीत NPCI चा मोठा निर्णय, आता कधीपासून मोजावे लागणार पैसे?

Nalasopara : लग्नाचं आमिष दाखवून तरुणीवर वारंवार अत्याचार; आणखी ७० ते ८० महिलांच्या शोषणाचाही आरोप

Punjab : फेसबुक लाइव्ह सुरू असतानाच गोळीबार; ड्रग्सविरोधी कार्यकर्ते परविंदर झोटा यांची हत्या, Video

मुंबईकरांनो, पाण्याचा गैरवापर केला तर कारवाई! २०२७ पर्यंतच्या पाणी नियोजनाचे आव्हान, १० टक्के पाणीकपात कायम

Cyber Scam : व्हॉट्सॲपवर आलेल्या 'त्या' मेसेजला 'NO' रिप्लाय करताय? बँक खातं होऊ शकतं रिकामं; पोलिसांचा इशारा