ठाणे

व्हिडीओ व्हायरल करू सांगत अत्याचार ; पीडितेची आत्महत्या, कल्याणमध्ये ८ जण ताब्यात

धक्कादायक बाब म्हणजे सात जणांना पीडितेची मैत्रीण मदत करत होती. याप्रकरणी पोलिसांनी संशयित आठ जणांना अटक केली असून

निलम चौधरी

कल्याण पूर्व परिसरात एका तरुणीने राहत्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. या प्रकरणी कोळशेवाडी पोलिसांनी तपास सुरू केला होता. तपासादरम्यान मृत तरुणीच्या मोबाईलमध्ये पोलिसांना सुसाईड नोट आढळली. व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तरूणीवर दीड वर्षांपासून ७ जण अत्याचार करत असल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून संशयित ८ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. तिच्याच परिसरामध्ये राहणारे हे सात तरुण व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत दीड वर्षांपासून लैंगिक अत्याचार करत होते हे उघड झाले. धक्कादायक बाब म्हणजे सात जणांना पीडितेची मैत्रीण मदत करत होती. याप्रकरणी पोलिसांनी संशयित आठ जणांना अटक केली असून अधिक तपास सुरू आहे. दरम्यान, संशयित आरोपींमध्ये काहीजण कल्याणमधील धनदांडग्या बिल्डरची मुले असल्याची माहिती समोर येत आहे.

'हस्तक्षेप करणारे तुम्ही कोण?' NALSAR प्रकरणात सरन्यायाधीश सूर्य कांत यांचा BCI ला सवाल

ST च्या स्मार्टकार्डला उत्स्फूर्त प्रतिसाद; १ कोटीहून अधिक प्रवाशांची नोंदणी, ६४ लाखांहून अधिक कार्ड सक्रिय

अल्पवयीन मुलांना कट्टरपंथी बनवण्याचा प्रयत्न; ATS कडून आंतरराज्यीय नेटवर्कचा पर्दाफाश

रेल्वेचे तिकीट तपासनीस होणार हायटेक; टीसी आणि प्रवाशांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद करणार

शाळांमधील शिक्षकेतर पदभरतीचा मार्ग सुकर; शासनाकडून पदभरतीस मान्यता