ठाणे

कसारा घाटात ट्रक दरीत कोसळून दोन ठार

मुंबई-नाशिक महामार्गावरील नवीन कसारा घाटात धावता ट्रक दरीत कोसळल्याची दुर्घटना शुक्रवारी घडली.

Swapnil S

शहापूर : मुंबई-नाशिक महामार्गावरील नवीन कसारा घाटात धावता ट्रक दरीत कोसळल्याची दुर्घटना शुक्रवारी घडली. ही घटना पहाटेच्या सुमारास घडले असून या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला.

स्थानिक पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार नाशिक येथून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगात निघालेला सिमेंट गोणीने भरलेला ट्रक नवीन कसारा घाटातील मार्गावर ब्रेक फेल पॉइंट लगत असलेल्या दरीत कोसळला. ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे समोर आले असून या अपघातात ट्रकचालक मोहम्मद सौद अमीर अतीक अहमद (२७) आणि त्यांचा सहकारी अब्दुल मजीद अब्दुल वहाब (७०) यांचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस केंद्र कसारा, ग्रामीण पोलीस रूट पेट्रोलिंग टीम, घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर काही सदस्यांनी दरीत उतरून दोघांचे मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले.

या अपघाताची नोंद कसारा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे, अधिक तपास पोलीस करत आहेत.

Nepal Earthquake : नेपाळमध्ये भूकंप; भारतासह 'या' देशांनाही धक्के, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

हेपेटायटिस-बीचा वाढता धोका! रुग्णसंख्येत चार वर्षांत जवळपास दुपटीने वाढ; नव्या रुग्णांत ९६ टक्के वाढ

ताजमहालची सहल आटोपून परतणाऱ्या विद्यार्थ्यांवर काळाचा घाला! उभ्या स्कूल बसला ट्रकची धडक; ४ विद्यार्थ्यांचा मृत्यू, ३२ जखमी

Mumbai : भाडेतत्त्वावरील बसगाड्यांचे होणार परफॉर्मन्स ऑडिट! आर्थिक तोटा व सुरक्षेच्या प्रश्नांमुळे कंत्राटांचा फेरआढावा

'हापूस'वर गुजरातचा डोळा; नावावर वलसाडची दावेदारी, बाजारपेठ काबीज करण्याचा डाव