Ulhasnagar : गणेशोत्सवात मनमानी मंडपांना ब्रेक; रस्ते अडवणाऱ्या मंडळांवर महापालिकेची करडी नजर, रस्ते, विसर्जन घाट अन् सुरक्षेवर प्रशासनाचा ‘वॉच’ 
ठाणे

Ulhasnagar : गणेशोत्सवात मनमानी मंडपांना ब्रेक; रस्ते अडवणाऱ्या मंडळांवर महापालिकेची करडी नजर, रस्ते, विसर्जन घाट अन् सुरक्षेवर प्रशासनाचा ‘वॉच’

यंदाच्या गणेशोत्सवात रस्ते अडवून किंवा रस्ते खोदून मंडप उभारणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना महापालिकेने स्पष्ट इशारा दिला आहे.

Swapnil S

उल्हासनगर : यंदाच्या गणेशोत्सवात रस्ते अडवून किंवा रस्ते खोदून मंडप उभारणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना महापालिकेने स्पष्ट इशारा दिला आहे. मंडप परवानगी देताना वाहतुकीला अडथळा होणार नाही याची सक्त दक्षता घेण्याचे आदेश प्रभाग अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्याचबरोबर सात फुटांपेक्षा उंच गणेशमूर्तींचे विसर्जन कल्याण खाडीत नियोजनबद्ध पद्धतीने करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

यंदाचा गणेशोत्सव १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान साजरा होणार असून त्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यालयातील स्थायी समिती सभागृहात संयुक्त आढावा बैठक घेण्यात आली.

उत्सव काळात शहरातील रस्ते व खड्ड्यांची पाहणी करून तातडीने आवश्यक कार्यवाही करणे, विसर्जन घाट आणि कृत्रिम तलावांची दुरुस्ती करणे तसेच विसर्जनस्थळी येण्या-जाण्यासाठी स्वतंत्र मार्ग ठेवण्याचे निर्देश देण्यात आले.

समन्वय साधण्याच्या सूचना

सर्व विसर्जनस्थळी सीसीटीव्ही बसवण्यासह सोसायट्यांमध्ये कृत्रिम विसर्जनाची सुविधा उपलब्ध करण्यावर भर देण्यात आला.

गणेश मंडळांनी परवानगी घेताना मूर्तीची उंची, विसर्जनाची तारीख आणि वेळ नमूद करणे बंधनकारक राहणार आहे. सात फुटांवरील मूर्तींचे कल्याण खाडीत विसर्जन होत असल्याने संबंधित मंडळांनी उल्हासनगर आणि कल्याण-डोंबिवली महापालिकेशी समन्वय साधण्याच्या सूचना देण्यात आल्या.

सहकार्याचे आवाहन

पर्यावरणपूरक मूर्ती व सजावटीला प्रोत्साहन, निर्माल्याची योग्य विल्हेवाट, शांतता क्षेत्रात ध्वनिप्रदूषण रोखणे आणि उत्कृष्ट पर्यावरणपूरक मंडळांना पारितोषिक देण्याचेही नियोजन करण्यात येणार आहे. विसर्जनस्थळी वैद्यकीय पथके, अग्निशमन व सुरक्षा यंत्रणा सज्ज ठेवण्यात येणार असून विद्युत व्यवस्था, स्वच्छता, वाहतूक आणि कायदा-सुव्यवस्थेसाठी संबंधित विभागांना जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

ठाण्यात आज पाहायला मिळणार दहीहंडीचा जल्लोष; थरावर थर आणि लाखांची बक्षिसे; मंडळांमध्ये मोठी चुरस

Mumbai : मध्य रेल्वे मार्गावर उद्या मेगाब्लॉक; मुख्य आणि हार्बर मार्गावर ब्लॉक

Mumbai : ट्रिपल रायडिंगला 'ब्रेक'; ट्रकच्या टपावरून प्रवास टाळण्याचे आवाहन

Mumbai : मुख्यालयासमोरच पालिकेचे नवे सभागृह; ३३२ नगरसेवकांची आसनव्यवस्था, ३० कोटींचा खर्च अपेक्षित

१० थरांसाठी गोविंदांची चुरस! मुंबई, ठाण्यातील दहीहंडीकडेही लक्ष