ठाणे

उल्हासनगरात डेंग्यूचा शिरकाव; तीन वर्षीय बालिका बाधित, नागरिकांमध्ये भीतीचे सावट

उल्हासनगर शहर पुन्हा एकदा डेंग्यू आणि मलेरियाच्या धोक्याच्या छायेत आले आहे. याच पार्श्वभूमीवर एका तीन वर्षीय बालिकेला डेंग्यूची लागण झाली असून, ती सध्या खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. दरम्यान, परिसरातील अनेक रहिवाशांना डेंग्यू व मलेरियासदृश लक्षणे दिसून येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Swapnil S

उल्हासनगर : उल्हासनगर शहर पुन्हा एकदा डेंग्यू आणि मलेरियाच्या धोक्याच्या छायेत आले आहे. चौपदरीकरणासाठी रेल्वे करण्यात आलेल्या घरतोडक कारवाईनंतर उभा राहिलेला मलबा तसाच सोडल्यामुळे परिसरात डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर एका तीन वर्षीय बालिकेला डेंग्यूची लागण झाली असून, ती सध्या खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. दरम्यान, परिसरातील अनेक रहिवाशांना डेंग्यू व मलेरियासदृश लक्षणे दिसून येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

उल्हासनगर शहरात सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. रेल्वे स्टेशनपासून भीमनगर आणि वासीटा कॉलनी परिसरातील रेल्वे लाइन चौपदरीकरणासाठी उल्हासनगर-४ मधील अनेक घरांवर काही महिन्यांपूर्वी तोडक कारवाई करण्यात आली होती. मात्र, या कारवाईनंतर जमा झालेला मलबा अद्यापही जागेवरच ठेवण्यात आला असून, त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आलेली नाही.

या मलब्यातून साचलेले पाणी, वाढणारी घाण आणि डासांची उत्पत्ती यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे. याचाच परिणाम म्हणून लहान मुलीला डेंग्यूची लागण झाली आहे, तर काही अन्य नागरिकांनाही ही लक्षणे दिसत आहेत.

या पार्श्वभूमीवर स्थानिक भाजप नेते नीलेश बोबडे यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी रेल्वे अभियंते आणि प्रभाग अधिकाऱ्यांशी तातडीने चर्चा केली. त्या ठिकाणी असलेला

मलबा कशा पद्धतीने उचलता येईल आणि तातडीने स्वच्छता कशी करता येईल, याबाबत त्यांनी महत्त्वपूर्ण प्रयत्न सुरू केले आहेत. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेऊन त्यांनी प्रशासनाला अधिक जबाबदारीने काम करण्याचे आवाहन केले आहे.

नागरिकांच्या जीवनाशी निगडित या गंभीर समस्येवर तातडीने उपाययोजना न केल्यास डेंग्यू-मलेरियाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता असल्याचे आरोग्य विभागातील जाणकारांनी इशारा दिला आहे.

स्थानिकांची नाराजी

परिसरातील रहिवाशांनी या समस्येसाठी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तोडक कारवाईनंतर मलबा साफ करण्यात आला नाही, त्यामुळे डेंग्यू-मलेरियाचा प्रादुर्भाव वाढत आहे. लहान मुले आजारी पडत आहेत, तरीही पालिका प्रशासन निष्क्रिय दिसत आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिकांनी दिली.

Mumbai : पिण्याच्या पाण्याची स्थिती गंभीर; धरण क्षेत्रात समाधानकारक पावसाची प्रतीक्षा

प्रथमच 'फायर इंजिन'चे स्टेअरिंग महिलेच्या हाती; आत्मविश्वास असेल तर अशक्य ही शक्य - पल्लवी पाटील यांचा विश्वास

लग्नपत्रिकेत वधूवरांची जन्म तारीख बंधनकारक करण्याचा विचार; बालविवाह रोखण्यासाठीचा उपाय

यंदाची आषाढी वारी जगभर पोहोचणार; डिस्कव्हरी आणि जिओग्राफी वाहिन्यांवरून थेट प्रक्षेपण

मान्सूनने महाराष्ट्र घेतला कवेत; १४ जिल्ह्यांत ‘ऑरेंज अलर्ट’