Ulhasnagar : पहाटेच्या अंधारात ‘ड्रग्ज डील’चा पर्दाफाश; रामकृष्ण कॉलनीत लाखोंच्या एमडी ड्रग्जसह दोघांना अटक  
ठाणे

Ulhasnagar : पहाटेच्या अंधारात ‘ड्रग्ज डील’चा पर्दाफाश; रामकृष्ण कॉलनीत लाखोंच्या एमडी ड्रग्जसह दोघांना अटक

शहरातील अमली पदार्थांच्या विळख्याला आळा घालण्यासाठी मध्यवर्ती पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल २३६.५ ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) ड्रग्जचा साठा जप्त केला आहे.

Swapnil S

उल्हासनगर : शहरातील अमली पदार्थांच्या विळख्याला आळा घालण्यासाठी मध्यवर्ती पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल २३६.५ ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) ड्रग्जचा साठा जप्त केला आहे. सुमारे ३ लाख ३८ हजार रुपये किमतीच्या या अमली पदार्थांसह दोन आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या असून या कारवाईमुळे शहरातील ड्रग्ज तस्करीचे मोठे रॅकेट उघडकीला येण्याची शक्यता आहे.

पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांच्या मध्यवर्ती पोलिसांच्या पथकाने मंगळवारी पहाटे सुमारे ३ च्या सुमाराला रामकृष्ण कॉलनीतील गुलशन-ए-बगदाद मशिदीजवळ ही कारवाई केली. पोलिसांनी रेहान शेख (३८), अरबाज खान (१९) या दोघांना ताब्यात घेतले तर शमसाद खान आणि नेपाळचा रहिवासी असलेल्या आसीम खान फरार झाले आहेत. अटक आरोपीच्या ताब्यातून २३६.५ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. जप्त केलेल्या अमली पदार्थांची अंदाजे किंमत ३ लाख ३८ हजार रुपये आहे.

धागेदोरे नेपाळपर्यंत

मध्यवर्ती पोलीस ठाण्यात या प्रकरणी एनडीपीएस कायदा, १९८५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. विशेषतः नेपाळमधील आरोपीचा या प्रकरणात समावेश असल्याने या ड्रग्जचा पुरवठा नेमका कुठून झाला, त्याची उल्हासनगरमध्ये विक्री कोणाला केली जाणार होती आणि या साखळीमागे आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा पोलीस कसून शोध घेत आहेत.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Kolkata Hotel Fire: हॉटेलमध्ये आगीचा भडका! झोपेतच ९ जणांचा दुर्दैवी अंत, ६ जण जखमी; VIDEO

मुंबई महापालिकेच्या कारभारात ५० ‘फेलो’; स्थायी समिती अध्यक्ष, आयुक्तांसह खाते प्रमुखांच्या दिमतीसाठी नियुक्ती

दिव्यांगांसाठी पेन्शन योजना पुन्हा कार्यान्वित; मुंबईतील ५६ हजारांहून अधिक दिव्यांगांना दिलासा

Mumbai : विद्यार्थ्यांना परीक्षा कक्षात ३० मिनिटे अगोदर उपस्थित राहणे अनिवार्य

Mumbai : वांद्रे येथील मैदानाच्या आरक्षण बदलाचा प्रस्ताव मंजूर; नेव्हिल डिसूझा फुटबॉल मैदानावर प्रदर्शन व सेंटर उभारण्याचा मार्ग मोकळा