गणेश विसर्जनाला बंदी, छठपूजेला परवानगी; उल्हासनगरात राजकीय वादाला तोंड प्रातिनिधिक छायाचित्र
ठाणे

गणेश विसर्जनाला बंदी, छठपूजेला परवानगी; उल्हासनगरात राजकीय वादाला तोंड

उल्हास नदीतील प्रदूषणाचे कारण देत गणेश विसर्जनाला बंदी घालण्यात आली होती. मग त्याच नदीत छठपूजेला परवानगी कशी दिली जाते, असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष बंडू देशमुख यांनी उपस्थित केला आहे.

Swapnil S

उल्हासनगर : उल्हास नदीतील प्रदूषणाचे कारण देत गणेश विसर्जनाला बंदी घालण्यात आली होती. मग त्याच नदीत छठपूजेला परवानगी कशी दिली जाते, असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष बंडू देशमुख यांनी उपस्थित केला आहे. उल्हासनगरातील अँटेलिया घाटावर छठपूजेच्या तयारीला सुरुवात झाल्यानंतर या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले असून, मनसेने महापालिका प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

छठ महापर्वाच्या पार्श्वभूमीवर अँटेलिया घाटावर सुरू असलेल्या तयारीवरून हा वाद निर्माण झाला आहे. याच घाटावर जलप्रदूषणाचे कारण पुढे करत गणेश विसर्जनाला निर्बंध घालण्यात आले होते. मात्र, आता छठपूजेसाठी त्याच नदीत व्यवस्था केली जात असल्याने प्रशासनाचे नियम वेगवेगळे आहेत का? छठपूजेमुळे उल्हास नदीचे प्रदूषण होणार नाही का? असा सवाल देशमुख यांनी केला.

दरम्यान, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या निर्देशानुसार शिवसेनेचे शहरप्रमुख तथा ज्येष्ठ नगरसेवक राजेंद्रसिंह भुल्लर महाराज आणि महापौरांचे पती कमलेश निकम यांनी महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे व अतिरिक्त आयुक्त डॉ. धीरज चव्हाण यांना निवेदन दिले आहे. १४ ते १६ नोव्हेंबरदरम्यान आयडीआय आणि अँटेलिया घाटावर छठपूजेसाठी सर्व सुविधा पुरविण्याची मागणी करण्यात आली आहे.

पर्यावरणप्रेमींमार्फत नदी प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित

छठपूजेनंतर उल्हास नदी बचाव समितीच्या सदस्यांनी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात निर्माल्य आणि कचरा बाहेर काढला होता. त्यामुळे पर्यावरणप्रेमींनीही नदी प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला आहे. महापालिका उपायुक्त स्नेहा करपे यांनी घाट परिसरात अस्वच्छता होऊ नये, यासाठी कठोर निर्देश दिल्याचे सांगितले. दरम्यान, महापौर अश्विनी निकम यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. त्यामुळे गणेश विसर्जन आणि छठपूजेच्या नियमांतील कथित दुजाभावावरून उल्हासनगरातील राजकीय वाद अधिक चिघळण्याची चिन्हे आहेत .

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चांना अखेर पूर्णविराम; सुप्रिया सुळे यांच्या स्पष्टोक्तीने चित्र स्पष्ट

KEM रुग्णालयात लिफ्ट बंदचे संकट कायम; रुग्णांच्या स्थलांतरानंतर उपचारात अडचणी, ऑर्थोपेडिक विभागाकडून रुग्णांची विभागणी

चिपी-नवी मुंबई विमानसेवा सोमवारपासून नियमित; आठवड्यातील सातही दिवस उड्डाणे; सिंधुदुर्गच्या पर्यटन आणि रोजगाराला मिळणार चालना

Bhayandar : जमिनीबाबत माहिती नाही; वोरांच्या जमीन प्रकरणात मेरवीन फर्नांडिस यांचा पोलिसांना जबाब

'खरे भाजपचे आहात का ? आधी डीएनए टेस्ट करा!' आमदार मंदा म्हात्रे यांचा गणेश नाईक यांचे नाव न घेता निशाणा