उल्हासगरमधील बाजारपेठ वाहतूककोंडीमुक्त होणार; ६० फुटी रस्त्याच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
ठाणे

उल्हासगरमधील बाजारपेठ वाहतूककोंडीमुक्त होणार; ६० फुटी रस्त्याच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव

कॅम्प क्रमांक ४ मधील ओ.टी. सेक्शन ते व्हिनस चौक हा गजबजलेला मुख्य बाजारपेठेचा रस्ता सध्या तीव्र वाहतूक कोंडीमुळे त्रस्त झाला असून, या समस्येवर लवकरच दिलासा मिळण्याची चिन्हे दिसत आहेत.

Swapnil S

उल्हासनगर : कॅम्प क्रमांक ४ मधील ओ.टी. सेक्शन ते व्हिनस चौक हा गजबजलेला मुख्य बाजारपेठेचा रस्ता सध्या तीव्र वाहतूक कोंडीमुळे त्रस्त झाला असून, या समस्येवर लवकरच दिलासा मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. उल्हासनगर महानगरपालिकाच्या विकास आराखड्यानुसार या रस्त्याचे सुमारे ६० फूट रुंदीकरण करण्याचा प्रस्ताव असून, अतिक्रमणे हटवून रस्ता मोकळा करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे.

कॅम्प क्रमांक ४ मधील हा रस्ता शहरातील अत्यंत वर्दळीचा आणि व्यापारी दृष्टिकोनातून महत्त्वाचा मानला जातो. दररोज मोठ्या प्रमाणावर नागरिक, ग्राहक आणि वाहनांची ये-जा होत असते. मात्र गेल्या अनेक वर्षांत रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाढलेल्या अतिक्रमणांमुळे रस्त्याची रुंदी घटत जाऊन सध्या ती केवळ सुमारे ३० फूटांपर्यंत मर्यादित राहिली आहे. परिणामी, परिसरात सतत वाहतूककोंडी होत असून कॅम्प ४ व ५ मधील नागरिकांसह व्यापाऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

वाहतूक कोंडीमुळे वायू व ध्वनी प्रदूषणातही वाढ झाल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहेत. काही दुकानदारांनी फुटपाथवर लोखंडी जाळ्या व शेड उभारून अतिक्रमण केल्याने पादचाऱ्यांना चालण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नसल्याचेही चित्र आहे.

मुख्य बाजारपेठेतील वाहतूककोंडी लक्षात घेता हा रस्ता किमान ६० फूट रुंद होणे अत्यावश्यक आहे. मात्र, या प्रक्रियेत दुकानदारांचे नुकसान होणार नाही, याचीही काळजी घेतली जाईल.दरम्यान, व्यापारी संघटनेचे प्रतिनिधी जगदीश तेजवानी यांनी सांगितले की, रस्ता रुंदीकरण आवश्यक असले तरी सुमारे १५० दुकानदारांचे पुनर्वसन करणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
चंद्रशेखर यादव, शिवसेना नगरसेवक
नगररचना विभागाकडून रस्त्याचे मोजमाप करून अतिक्रमणे हटवली जातील. त्यानंतर विकास आराखड्यानुसार रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येणार असून, भविष्यात या भागातील वाहतूककोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे.
निलेश शिरसाठे, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग महापालिका

Mumbai : भक्तांना दिलासा! POP च्या मोठ्या मूर्तींचे विसर्जन समुद्रात; उच्च न्यायालयाचा गतवर्षीचा निर्णय कायम

डिसुझा फुटबॉल मैदान प्रकरण : स्थिती ‘जैसे थे’ ठेवण्याचे न्यायालयाचे आदेश; आरक्षण बदलण्याच्या निर्णयावरून BMC ला धरले धारेवर

सुट्या खाद्यतेल विक्रीवर बंदी; अन्न आणि औषध प्रशासनाची घोषणा, उल्लंघन केल्यास ७ वर्षांपर्यंत कारावास

विद्यार्थ्यांपेक्षा मंत्र्यांच्या कुत्र्यांना चांगल्या सुविधा; अभिजीत दीपके आक्रमक, दादा भुसेंच्या राजीनाम्याची मागणी

साखरेच्या साठेबाजीला चाप; सणासुदीच्या तोंडावर व्यापाऱ्यांवर बंधने, ग्राहकांना दिलासा