ठाणे

अजित पवारांना मुख्यमंत्री करण्यासाठी गावोगावी जागृत अभियान; मुरबाडमध्ये राष्ट्रवादीची जनजागृती रॅली

Swapnil S

मुरबाड : गेल्या काही काळापासून राजकीय चळवळींकडे पाहण्याचा दृष्टिकोन सामान्य जनतेचा बदलत चालला आहे. परंतु महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांचा विचाराचा महाराष्ट्र अखंड राहावा त्यांच्या विचाराचा स्मरण व्हावे प्रत्येक सामान्य नागरिकाला न्याय मिळावा, असा कारभार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार करत आहेत. त्यांना राज्याचे मुख्यमंत्री बनवण्यासाठी संघटित शक्ती मजबूत करण्यासाठी गावागावात राष्ट्रवादीची रॅली जनजागृती करत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्याचे उपाध्यक्ष प्रमोदजी हिंदुराव यांनी मुरबाड येथे बोलताना सांगितले.

राज्याचे उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव जिल्हा अध्यक्ष, ठाणे जिल्हा ग्रामीण राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष भरत गोंधळे, महिला अध्यक्षा कल्पनाताई तारमळे, अरुण जाधव, ग्रामीण जिल्हा अध्यक्ष प्रतीक हिंदुराव, चंद्रकांत बोस्टे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भव्य रॅली मुरबाड विधानसभा मतदारसंघात काढण्यात आली होती छत्रपती शिवरायांच्या विचाराचा महाराष्ट्र पुन्हा घडवण्यासाठी अजित दादा पवार राज्याचे मुख्यमंत्री झाले पाहिजेत, एकच वादा अजितदादा अशा घोषणा देत छत्रपती शिवरायांचा रथ गावागावात फिरवण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेस अधिक बळकट करून येणाऱ्या लोकसभा विधानसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांना स्थान देऊन अजित पवारांचे हात बळकट करायचे आहेत, महिलांना, युवकांना रोजगार सबका साथ सबका विकास हा नारा देत विविध प्रकल्पांना चालना देण्यासाठी राष्ट्रवादी संघटना खेड्यापाड्यात शहरात मजबूत करण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे, युवक, महिलांनी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षात सामील व्हावे, असे आवाहन प्रमोद हिंदुराव यांनी केले.

मुरबाड मतदारसंघांमधील रथ यात्रा अंबरनाथ, बदलापूर, म्हसा, सासणे मार्ग मुरबाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आली रथयात्रेत मोठ्या संख्येने युवक महिला-पुरुष सहभागी झाले होते.

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल आज

Mumbai: आयआयटी कानपूरच्या २२ वर्षीय ग्रॅज्युएटने माहीममधील अपार्टमेंटमध्ये केली आत्महत्या!

एअर इंडिया एक्स्प्रेस कर्मचाऱ्यांचा संप मागे,कारवाईची पत्रे व्यवस्थापन मागे घेणार

Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्याचा भाव काय? जाणून घ्या मुख्य शहरातील दर!

आहारातील गडबड बेततेय जीवावर, ‘आयसीएमआर’चा खळबळजनक अहवाल