ठाणे

विरारमध्ये नावीन्यपूर्ण मोदक व उखाणे स्पर्धा; ज्वारी उकडी पान मोदकाला प्रथम क्रमांक

अननसाचे मोदक, ओल्या हळदीचे, गदाण्याचे, पंचरूची मोदक शतावरी, नागवेल पान, बीटरूट, दुधीचे, बेलाचे पान ड्रॅगन फ्रुट, ज्वारी उकडी पान मोदक असे अनेक पौष्टिक प्रकार विरारच्या यंगस्टार ट्रस्टने भरविलेल्या नावीन्यपूर्ण मोदक स्पर्धेत बघायला मिळाले. दुधी, ओरीओ, शुगर फ्री मोदकांनी लक्ष वेधून घेतले.

Swapnil S

वसई : अननसाचे मोदक, ओल्या हळदीचे, गदाण्याचे, पंचरूची मोदक शतावरी, नागवेल पान, बीटरूट, दुधीचे, बेलाचे पान ड्रॅगन फ्रुट, ज्वारी उकडी पान मोदक असे अनेक पौष्टिक प्रकार विरारच्या यंगस्टार ट्रस्टने भरविलेल्या नावीन्यपूर्ण मोदक स्पर्धेत बघायला मिळाले. दुधी, ओरीओ, शुगर फ्री मोदकांनी लक्ष वेधून घेतले.

ज्वारीचे उकडीचे पान मोदकात आशा म्हात्रे यांनी प्रथम, वनरंग मोदक अपर्णा कडू द्वितीय, शतावरी मोदक तृतीय, ड्रॅगन फ्रूट सिताफळ मोदक प्रीती पालकर उत्तेजनार्थ, पंचरूची मोदक लक्ष्मी लेंगरे उत्तेजनार्थ अशी बक्षीस या स्पर्धकांनी मिळवली.

विवा कॉलेजमधील हॉटेल मॅनेजमेंटच्या नम्रता खारकंडी, सिद्धेश वाडकर यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले. तसेच लगेच उखाणे स्पर्धा त्याच ठिकाणी म्हणजे जूने विवा कॉलेज मध्ये आयोजित केली होती.

उत्तेजनार्थ ममता बाणे, उत्तेजनार्थ अंजली कदम तृतीय मालती भटवलकर, द्वितीय हर्षा नाईक, आणि प्रथम अनुष्का घाडीगावकर यांना रोख पारितोषिक व सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. सौ. मुग्धा लेले आणि मिलिंद पोंक्षे यांचे यावेळी मार्गदर्शनलाभले. बक्षिस वितरणासाठी जेष्ठ समाजसेवक किरण ठाकूर, नगरसेविका रिटा सरवैयाव सीमा काळे, अॅड. नयन जैन, राजेश बक्षी वृंदा मयेकर उपस्थित होते. नेते हितेंद्र ठाकूर नेहमीच महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करत असतात. समन्वयक अजीव पाटील यांच्या सहकार्याने अनेक उपक्रम भरारी घेत असतात.

उखाणे घेत महिलांनी घेतला आनंद

राजकीय, सामाजिक पारंपरिक यापैकी कोणतेही दोन उखाणे घ्यायचे होते. 'बाहेर वातावरणात वाढलाय उष्मा घरी मागवला गारेगार फंटा अन्...... म्हणतात तू माझी प्रीती झिंटा,'... झाड झुंबराचे,.. फूल उंबराचं... असे विविध उखाणे घेत महिलांनी आनंद लुटला. ज्युनियर कॉलेजच्या स्मिता सावे यांनी परीक्षण केले.

Mumbai : कचरा साचण्याची ४९ संवेदनशील ठिकाणे कायमची हटवली; ७३ ठिकाणी सीसीटीव्हीची नजर

Mumbai : बेस्टचे अस्तित्व भाडेतत्त्वावर; स्वमालकीच्या बसेस चार हजारांहून २५० वर

Mumbai : महापालिकेकडून दिलेले मलबारो हाऊसचे प्लॅन्स रद्द व अमान्य घोषित

मुंबई तापाने फणफणली! महिनाभरात मलेरियाच्या १,३८० रुग्णांची नोंद; डेंग्यूचे ४६६, तर लेप्टोचे ७८ रुग्ण

भिवंडीत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत; अनेक सखल भागांत साचले पावसाचे पाणी