प्रातिनिधिक छायाचित्र
ठाणे

चिरनेर आदिवासी वाड्यांवर तीव्र पाणीटंचाई; ग्रामपंचायतीकडून टँकरने पाणीपुरवठा

चिरनेर ग्रा.पं. हद्दीतील चांदायली वाडी आणि केळ्याचा माळ या वाड्यांना तीव्र पाणीटंचाईची झळ बसू लागली आहे.

Swapnil S

राजकुमार भगत/ उरण

चिरनेर ग्रा.पं. हद्दीतील चांदायली वाडी आणि केळ्याचा माळ या वाड्यांना तीव्र पाणीटंचाईची झळ बसू लागली आहे. चिरनेर ग्रामपंचायतीच्या वतीने या वाड्यांना टँकरव्दारे पाणीपुरवठा सुरू असून जिल्हा परिषदेकडून या वाड्यांवर टँकरने पाणीपुरवठा करण्यात यावा,अशी मागणी ग्रामपंचायतीतर्फे करण्यात आली आहे. या आदिवासी वाड्यांमध्ये जवळ जवळ ४५ ते ५० आदिवासी कुटुंबाचे वास्तव्य आहे.

या वाड्यातील विहिरींनी जानेवारी महिन्यातच तळ गाठला आहे. आणि तेव्हापासून या आदिवासींची पाण्यासाठी वणवण सुरू आहे. ग्रामपंचायतीने या वाड्यांवर तातडीची सोय म्हणून मार्च महिन्याच्या सु‌रुवातीपासून टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे. मात्र या टँकरचा खर्च ग्रामपंचायतीला परवडत नसल्याने जिल्हा परिषदेतर्फे या वाड्यांना पाणीपुरवठा करावा अशा मागणीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेला पाठविण्यात आला आहे.

कामातील दिरंगाईचा स्थानिकांना फटका

चिरनेर ग्रामपंचायतीत गावातील नळांना एकीकडे धो-धो पाणी सुरू असून दुसरीकडे नळांना पाण्याचा एक थेंबही नाही,अशी विषम परिस्थिती आहे.शासनाने या आदिवासी वाड्यांना पाणीपुरवठा सुरळीत व्हावा,यासाठी जल जीवन योजनेतून १ कोटी ९८ लाख रुपयांची योजना मंजूर केली आहे. दीड-दोन वर्षांपासून या योजनेचे काम सुरू देखील झाले आहे मात्र २५ टक्क्यापर्यंतचे काम पूर्ण झाले असल्यामुळे आदिवासी वाड्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

ग्रामपंचायतीतर्फे मार्च महिन्यांपासून या वाड्यांवर टँकरने पाणीपुरवठा सूरू आहे. आत्ता ग्रामपंचायतीने जिल्हा परिषदेकडे टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे,तसा प्रस्ताव बिडीओमार्फत पाठविण्यात आला आहे.

- महेशकुमार पवार, (ग्रामविकास अधिकारी, चिरनेर)

BMC त सहाय्यक आयुक्त पदावर नेमणूक; पूर्णकालिक तत्त्वावरील पदासाठी १२ अर्ज दाखल; १० व १२ नोव्हेंबर रोजी होणार मुलाखत

१ ते १९ डिसेंबर या संसदेचे कालावधीत हिवाळी अधिवेशन

एसटीच्या तिकीट महसुलात सरासरी दैनंदिन तूट; अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी

बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला; २७ वर्षांपासून फरार असल्याने विशेष न्यायालयाने दिला झटका

एअर इंडिया विमान अपघात, तुमच्या मुलाचा दोष नाही; सुप्रीम कोर्टाने केले स्पष्ट