ठाणे

मरणानंतरही यातना कायम; नदीत उतरून निघतेय प्रेतयात्रेची वाट

डहाणू तालुक्यातील सोनाळे खुबरोखपाडा येथे अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमी नसल्याने येथील ग्रामस्थाना मरणानांतरही यातना भोगावे लागत असल्याचे चित्र आजही कायम आहे.

Swapnil S

नितीन बोंबाडे/ पालघर

डहाणू तालुक्यातील सोनाळे खुबरोखपाडा येथे अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमी नसल्याने येथील ग्रामस्थाना मरणानांतरही यातना भोगावे लागत असल्याचे चित्र आजही कायम आहे. सोनाळे खुबरोखपाडा येथील कै. जयराम शंकर झिरवा यांची अंत्ययात्रा तब्बल गुडघाभर पाण्यातून न्यावी लागल्याचे फोटो समाजमाध्यमावर पसरल्याने प्रशासनाच्या कारभारावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. त्यामुळे या पाड्याला स्मशानभूमी बांधून मिळावी, अशी मागणी होत आहे.

सोनाळे खुबरोखपाडा पोस्ट चारोटी येथील आदिवासी बांधवांना मृत्यूनंतरही मरणयातना कायम आहेत. आजपर्यंत सोनाळे खुबरोखपाडा येथील आदिवासी बांधवांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमी इमारत नाही गुडगाघाभर पाण्यातून जिवघेणा प्रवास करावा लागतो आणि त्याहीपेक्षा प्रेत जाळण्यासाठी अजूनही स्मशानभूमीची जागा आणि स्मशानभूमी इमारत नाही. अंत्यसंस्कार करण्यासाठी प्रेत खांद्यावर घेऊन कमरेभर पाण्यातून जीवघेणा प्रवास नित्याचाच करावा लागतो. ग्रामीण भागात सोयी सुविधांचा अभाव असल्यामुळे आणि त्या शासनाचा उडालेला बोजवारा पुन्हा एकदा उघड झाला आहे.

स्मशानभूमीपर्यंत रस्ताच नाही!

स्मशानभूमी इमारत आणि स्मशानभूमीपर्यंत रस्ता व पूल नसल्याने नहर कालवा पाट (कॅनल) नदीच्या धोकादायक पाण्याच्या प्रवाहातून प्रेत घेऊन कुटुंबातील सदस्य आणि गावकरी घेऊन जात असतानाचा हृदय हेलावून टाकणारा हा व्हिडीओ आणि फोटो सोनाळे खुबरोखपाडा येथील समोर आला आहे. गुडघाभर पाण्यातून पाण्यातून बाहेर वाट काढत मृतदेह अंत्यसंस्कार करण्यासाठी नेण्याची वेळ आली आहे. त्यामुळे प्रशासनाने याची दखल घेण्याची मागणी होत आहे.

UPSC उमेदवार पडताळणीसाठी AI ची मदत घेणार

Kalyan-Dombivli : रहिवाशांची फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई - शिंदे

संघर्षाची सुरुवात व शेवट कसा करायचा हे भारताकडून शिकावे! हवाई दलप्रमुख ए.पी. सिंग यांचे प्रतिपादन

आत्मनिर्भर भारतच देशाची शक्ती - मोदी

अमेरिकेचे व्हिसास्त्र! भारतीयांच्या 'अमेरिकन ड्रीम'ला ट्रम्प यांचा सुरुंग; नव्या H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये शुल्क आकारणार