ठाणे

ओव्हरटेक का केला? वादातून भिवंडीत रक्तरंजित राडा झाला; 18 जणांविरोधात गुन्हा, सहा जणांना अटक

Swapnil S

भिवंडी : ओव्हरटेक करण्यावरून वाद होऊन १८ जणांनी आपसात संगनमताने चौघांना बेदम मारहाण करून रक्तरंजित केल्याची घटना भिवंडीतून समोर आली आहे. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात १८ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, ६ जणांना अटक करण्यात आली आहे.

जॉय सुमित पाटील, कामेश पाटील, उज्ज्वल, वैभव भोकरे, रुपेश म्हात्रे, निलेश भोकरे, सन्नी पाटील, सुनील पाटील, विराज पाटील, बंटी पाटील, देवेंद्र म्हात्रे, अजय पाटील, रुपेश भोकरे, स्वप्नील पाटील, राहुल पाटील व त्यांचे अन्य ३ साथीदार अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत, तर देवेंद्र ईताडकर, हेमंत ईताडकर, सागर ईताडकर, योगेश तरे अशी जखमींची नावे आहेत.

२३ डिसेंबर रोजी ठाणे - भिवंडी रोडवरील काल्हेर येथील राजदीप ज्वेलर्सच्या समोर जखमी आणि आरोपींमध्ये ओव्हरटेक करण्यावरून वाद झाला होता. त्यानंतर वादाचे रूपांतर भांडणात झाल्याने आरोपींनी आपसात संगनमत करून जखमींना हाताच्या ठोश्याबुक्क्यांनी, हॉकीस्टिकने आणि योगेश तरे याच्या डोक्यात झाडाची कुंडी घालून त्यास जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करून गंभीर जखमी केले आहे. त्यामुळे याप्रकरणी देवेंद्रच्या फिर्यादीवरून १८ जणांच्या विरोधात नारपोली पोलीस ठाण्यात ३०७ सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून पोलिसांनी यामधील ६ जणांना ताब्यात घेऊन अटक केली आहे. पुढील तपास सपोनि शरद पवार करीत आहेत.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस