ठाणे

भिवंडीत धुक्याची चादर; मॉर्निंगवॉकवाल्यांची तारांबळ

तालुक्यातील शहरी आणि ग्रामीण भागात मागील ३ ते ४ दिवसांपासून मोठ्या प्रमाणात धुक्याची चादर पसरत असून धुक्यामुळे वाहनचालक, मॉर्निंगवॉकवाल्यांची तारांबळ उडत असल्याचे दिसून येत आहे.

Swapnil S

भिवंडी : तालुक्यातील शहरी आणि ग्रामीण भागात मागील ३ ते ४ दिवसांपासून मोठ्या प्रमाणात धुक्याची चादर पसरत असून धुक्यामुळे वाहनचालक, मॉर्निंगवॉकवाल्यांची तारांबळ उडत असल्याचे दिसून येत आहे.

सध्या राज्यभर गुलाबी थंडीची लाट सुरू असून रात्री आणि सकाळच्या सुमारास वातावरणात चांगलाच गारठा निर्माण होत आहे. त्यातच मागील काही दिवसांपासून सकाळी एक ते दोन तासांकरिता भिवंडी शहरासह ग्रामीणमध्ये धुक्याने रस्तेही व्यापले जात आहेत. त्यामुळे धुक्यातून वाट काढताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. यासह मॉर्निंगवॉक व कवायतीसाठी बाहेर पडणारे वयोवृद्ध, महिला वर्ग आणि खेळाडू यांची तारांबळ उडत आहे.

गेल्या काही दिवसांपासून महामुंबईतील तापमानाचा पारा घसरला आहे. त्यामुळे येथील थंडीत वाढ झाली असून अनेक ठिकाणी धुक्यांचे साम्राज्य पसरले आहे.

जातवर्गीय शिक्षण वास्तव

आजचा महाराष्ट्र ड्रग माफियांच्या सावलीत

आजचे राशिभविष्य, २२ डिसेंबर २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Maharashtra Nagar Parishad Election Result 2025 Live Updates : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा निकाल जाहीर; कोणत्या जिल्ह्यात कोण अव्वल?

निवडणुकांच्या निकालावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले, "हा तर महापालिका निवडणुकांचा ट्रेलर...