ठाणे

पावसाला सुरुवात झाल्याने शेतकरी राजाच्या आशा पल्लवित झाल्या

पावसाच्या पाण्यावर आणि पारंपरिक पद्धतीने आजही स्थानिक शेतकरी शेती करीत आहेत.

प्रतिनिधी

उन्हाचा तडाखा संपून आता पावसाच्या सरी बरसल्याने जव्हार तालुक्यातील लहान थोरांपासून वृक्ष वेली आणि जनावरे देखील आनंदून न्हाली आहेत. तालुक्यातील बळीराजा शेतकरी शेतकामाच्या घाईला आता जुटला आहे. शनिवारपासून पावसाला सुरुवात झाल्याने शेतकरी राजाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत तालुक्यात नांगरणीच्या कामाला आता वेग येणार आहे.

पावसाच्या पाण्यावर आणि पारंपरिक पद्धतीने आजही स्थानिक शेतकरी शेती करीत आहेत. तालुक्यात पावसाने समाधान कारक हजेरी लावल्याने बळी राजा आनंदून जाऊन शेतीच्या कामास प्रारंभ केला आहे. सध्यस्थितीत नांगरणीची कामे सुरु असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. तालुक्याचे भौगोलिक क्षेत्रफळ ८५,८०६ हेक्टर त्यापैकी ७ हजार हेक्टर भातपिकासाठी असून नागली- ४९०० हेक्टर, वरई४३०० हेक्टर, कडधान्य २४०३ हेक्टर व गळीतधान्य- ८४३ हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आहे. तालुक्यातील सरासरी २५०० ते ३००० मि.मी. इतके पर्जन्यमान आहे. पावसाळाभर शेती करून त्यातून आलेल्या पिकाच्या आधाराने वर्षभर खानापणाची व्यवस्था होत असते. मुख्य भात, पीक असल्याने हळवी आणि गरवी अशा दोन प्रकारची शेती या तालुक्यात करण्यात येत आहे.

गेल्या काही वर्षांपासून भातपिकाला आवश्यक वातावणात बदल होत चालेला आहे. निसर्गाचा लहरीपणाने भात शेती दिवसेंदिवस धोक्यात आली त्यातच भरमसाठ महागाई आहे. महागाईने डोक वर काढल्याने गरीब शेतकरी शेती साहित्यामध्ये होणाऱ्या भाव वाढीने त्रस्त झाले आहेत. शेती करण्यासाठी येणारा खर्च व त्यातून मिळणारा अल्प नफा यामुळे शेती करणे तितकेचे पूर्वीप्रमाणे सोपे राहिलेले नाही. यावर्षी वरून राजा बळीराजाला साथ देईल, अशी आशा आहे.

शिवरायांचे किल्ले ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळ यादीत

मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याचा कॅनडातील कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार

सरकारची इलेक्ट्रिक ट्रक प्रोत्साहन योजना सुरू; PM e-Drive अंतर्गत ९.६ लाख रु.मिळणार

टेस्ला पुढील आठवड्यात भारतात प्रवेश करण्यास सज्ज; वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पहिले शोरूम सुरू करणार

अजित पवारांची माफी मागा! लक्ष्मण हाके यांना राष्ट्रवादीची नोटीस