ठाणे

डॉक्टरच्या खुनाची सुपारी देणाऱ्या महिलेस अटक

ठाणे खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली होती

Swapnil S

ठाणे : नाशिक येथील एका डॉक्टराच्या खुनाची सुपारी देणाऱ्या महिलेस ठाणे खंडणी विरेाधी पथकाने बाळकुम परिसरातून रविवारी अटक केली. सदर महिला नाशिक येथील डॉक्टरास ब्लॅकमेल करून ५० लाखांची मागणी करीत होती. पैसे न दिल्यास हत्येची धमकी या महिलेने डॉक्टरास दिली होती, असे पोलीस तपासातून समोर आले आहे.

ठाणे खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली होती की, नेहा जाधव ही महिला नाशिकस्थित व्यवसायाने डॉक्टर असलेल्या इसमाची सुपारी देऊन खुन करण्यासाठी मारेकऱ्याचे शोधात आहे. त्यानंतर खंडणी विरोधी पथकाने बनावट मारेकरी म्हणून एका इसमास पाठवुन मिळालेल्या बातमीची खातरजमा केली. दरम्यान, नेहा जाधव याने बनावट मारेकरी म्हणून पाठविलेल्या इसमास नाशिकस्थित डॉक्टर किरण बेंडाळे यांचा खुन करण्यासाठी तीन लाख रूपयात सुपारी देवुन, किरण बेंडाळे यांचा फोटो, काम करण्याचे ठिकाणाची माहिती, विषारी इंजेक्शन, सिरींज बनावट मारेकऱ्यास दिले. त्यानंतर पोलिसांनी महिलेस सुपारीची रक्कम देताना रविवारी रंगेहात अटक केली.

अदानींनी अंबानींना मागे टाकले; गौतम अदानी ठरले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

केंद्र सरकारचा निर्णय; ‘आधार' ॲपची सक्ती नाही, प्री-इन्स्टॉलचा प्रस्ताव रद्द

Dhule : 'कोणीतरी ओढत नेतंय'? १८ वर्षीय तरुणी दिवसाढवळ्या बेपत्ता; CCTV मधील दृश्यांमुळे नागरिक हैराण

पवन खेडा यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा नाही; अटकपूर्व जामिनासाठी आसाम न्यायालयात जाण्याचे निर्देश

Nagpur : १८ बाटल्या फोडल्या; दारू नाकारताच तरुणांचा बारमध्ये धुडगूस, मॅनेजर रक्तबंबाळ, VIDEO व्हायरल