ठाणे

भरगच्च गर्दीत चढणं जीवावर बेतलं; कर्जत लोकलमधून पडून महिलेचा मृत्यू, अंबरनाथ-बदलापूर स्थानकांदरम्यान घटना

रात्री ८ वाजता अंबरनाथहून सुटलेली कर्जत लोकल तब्बल २५ मिनिटे उशिराने धावत होती. त्यामुळे प्रवाशांची प्रचंड गर्दी होती.

Swapnil S

उल्हासनगर : भरगच्च गर्दीमुळे कर्जतला जाणाऱ्या लोकलमधून पडून मंगळवारी रात्री एका महिलेचा मृत्यू झाला. ऋतुजा गणेश जंगम (२८ वर्षे) असे या महिलेचे नाव आहे. अंबरनाथ आणि बदलापूर रेल्वे स्थानकांदरम्यान ही धक्कादायक घटना घडली.

मंगळवारी रात्री ८ वाजता अंबरनाथहून सुटलेली कर्जत लोकल तब्बल २५ मिनिटे उशिराने धावत होती. त्यामुळे प्रवाशांची प्रचंड गर्दी या ट्रेनमध्ये झाल्याचे समजते. स्थानकावर लोकल येताच प्रवाशांनी आत शिरण्यासाठी मोठी चढाओढ सुरू केली. याच गर्दीच्या रेट्यामुळे ऋतुजा जंगम यांना ट्रेनमध्ये आत प्रवेश करता आला नाही, आणि त्या दरवाज्यात अडकल्या. अंबरनाथ स्थानक सोडल्यावर काही अंतरावरच गर्दीमुळे त्यांचा हात सुटला आणि त्या रेल्वे रुळांवर पडल्या. हा अपघात इतका गंभीर होता की त्यांना तत्काळ उपचारासाठी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांना वाचवणे शक्य झाले नाही, आणि डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेचा तपास रेल्वे पोलिसांकडून सुरू आहे.

रेल्वे प्रशासनाच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह

रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी विविध उपाययोजना केल्या असल्या तरी त्या पुरेशा ठरत नाहीत. दररोज लाखो प्रवासी या उपनगरीय रेल्वेतून प्रवास करतात, परंतु त्यांना सुरक्षितता देणे ही रेल्वे प्रशासनाची जबाबदारी आहे. अशा अपघातांमुळे प्रवाशांच्या जिवाशी खेळले जात आहे, आणि रेल्वे प्रशासनावर आक्षेप घेण्यात येत आहेत.

प्रवाशांची सावधगिरी आणि प्रशासनाची जबाबदारी

प्रवाशांनी गर्दीच्या वेळी संयम ठेवणे आणि सावधगिरी बाळगणे महत्त्वाचे असते. परंतु अशा दुर्घटनांपासून बचाव करण्यासाठी रेल्वे प्रशासनानेही अधिक सजग होणे गरजेचे आहे. ट्रेनच्या वेळापत्रकातील अचूकता राखून, स्थानकांवरील सुरक्षा उपाय आणि प्रवाशांना प्रवेशासाठी पुरेशी जागा उपलब्ध करून दिल्यास अशा अपघातांना आळा घालता येईल.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

‘सिंह’ म्हातारा झालाय!

‘बटेंगे तो कटेंगे’, ओबीसीने भाजपला तारले