ठाणे

ठाणे जिल्हा परिषद ऑनलाईनच्या वाटेवर; बांधकाम विभागातील कामांचे आता लॉटरी पद्धतीने वाटप

Swapnil S

ठाणे : ठाणे जिल्हा परिषदेमार्फत सुशिक्षित बेरोजगार अभियंता मजूर कामगार सहकारी संस्था यांना बांधकाम विभागातील १० लाखांच्या आतील विकासकामे आता ऑनलाईन लॉटरी पद्धतीने मिळणार आहेत. विकासकामांना गती देण्याच्या तसेच आर्थिक व्यवहार पारदर्शकपणे करण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषदेने ऑनलाईनचा मार्ग निवडला असून त्याचे सर्वस्तरावर कौतुत होत आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रात पहिल्यांदाच जिल्हा परिषद ठाणे मार्फत पेमेंट गेटवेचा वापर केला जाणार आहे. लॉटरी पद्धतीने मिळणाऱ्या विकासकामांचे वाटप शुक्रवारी बी. जे. हायस्कूल येथे करण्यात आले. सन २०२४-२५ या वर्षातील‌ १६६ विकासकामांचे वाटप ऑनलाईन लॉटरी पद्धतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे व अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.‌

जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी तंत्रज्ञानाची जोड घेऊन विकासकामांचे लॉटरी पद्धतीने वाटप करण्यात आले. यामार्फत काम वाटप आणि आर्थिक व्यवहार पारदर्शकपणे करण्याच्या उद्देशाने कामकाज करण्यात आले आहे. पुढील कामवाटप नियोजन ऑनलाईन लॉटरी पद्धतीने फेसबुक, युट्यूब दूरदृश्यप्रणाली द्वारे देखील (लाईव्ह) करण्यात येणार आहेत. विकासकामांना गती मिळण्यासाठी ही उत्तम सुरुवात असल्याचे म्हटले जात आहे. त्याचबरोबर कामे देखील उत्तम पद्धतीने व्हावी, अशी अपेक्षा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी व्यक्त केली.

मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील विकास कामाचे वाटप ऑनलाईन लॉटरी पद्धतीने करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले असून कामवाटप, वेळेची बचत, पारदर्शकता आणण्यासाठी ऑनलाईनचा वापर हा मोलाचा ठरत आहे. कामवाटप ऑनलाईन पद्धतीने राबवणारी महाराष्ट्रातील ठाणे ही ७ वी जिल्हा परिषद असून पेमेंट गेटवे वापर करणारी महाराष्ट्रातील ठाणे जिल्हा परिषद ही पहिली ठरली आहे. तंत्रज्ञानाच्या वापरामुळे कामांना गती मिळणार असून लॉटरी पद्धतीने काम मिळालेल्या सर्वांचे अभिनंदन, असे प्रास्ताविक करताना अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रूपाली सातपुते यांनी मार्गदर्शन केले.‌ यावेळी कार्यकारी अभियंता (बांधकाम) संदिप चव्हाण, उप कार्यकारी अधिकारी सुनिल बच्छाव, आरेखक संजीव यशवंत, बांधकाम विभागातील अधिकारी व कर्मचारी, ठेकेदार, सुशिक्षित बेरोजगार अभियंता मोठ्या संख्येने उपस्थित होते.

८६६ ऑनलाईन अर्ज प्राप्त

ही प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने कामाच्या चिठ्ठ्या काढून लॉटरी पद्धतीने राबविण्यात येत होती. कामांचे विभाजन योग्य पध्दतीने करण्यासाठी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून १ कोटी रकमेची काम ठेकेदाराने पूर्ण केल्यानंतर पुढील काम नवीन ठेकेदारास देण्यात येणार आहे.‌ ekamwatapthanezp.in या संकेतस्थळावर विकासकामे प्राप्त करण्यासाठी ८६६ ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले होते.

ही कामवाटप प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवली जात असल्याने जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार अभियंता व मजूर कामगार सहकारी संस्थेचे पदाधिकारी यांनी समाधान व्यक्त केले आहे. ऑनलाईन लॉटरी पद्धतीने काम मिळाल्यामुळे जिल्हा परिषदेचे आभार व्यक्त करतो. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे, सद्यस्थिती, पुढील कामाचे नियोजन करण्यासाठी सुलभता निर्माण झाली आहे. - सिताराम भावार्थे, पदाधिकारी मजूर संस्था

पूर्वीची ऑफलाईन प्रक्रिया राबविताना कागदपत्रांचा वापर जास्त प्रमाणत होत होता, तसेच जमा झालेली रक्कम चलनाद्वारे बँकेत भरावी लागत होती. आता ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणारी कामवाटप प्रक्रियेत स्टेशनरीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाचणार असून निविदा रकमेचा भरणा हा संबधित सुशिक्षित बेरोजगार अभियंता मजूर कामगार सहकारी संस्था यांच्या बँक खात्यातून ऑनलाईन पद्धतीने जिल्हा परिषदेच्या बँक खात्यात जमा होणार आहे. तसेच ऑनलाईन सॉफ्टवेअरद्वारे विकासकामांचे वाटप झाले असून कामकाज वेगवान तंत्रज्ञान युक्त व पारदर्शक होणार आहे. यामुळे खऱ्या अर्थाने ठाणे जिल्हा परिषद हायटेक झालेली आहे. - संदीप चव्हाण, माहिती कार्यकारी अभियंता (बांधकाम)

मविआचा तिढा सुटला! २६० जागांवर सहमती; २८ जागांवर रस्सीखेच; १-२ दिवसांत जागावाटप जाहीर होणार

पोलिसांवर हायकोर्ट संतापले; अतिरिक्त पोलीस आयुक्तांना हजर राहण्याचे आदेश

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; तिकीट आरक्षणाच्या नियमात बदल; १ नोव्हेंबरपासून होणार लागू

Maharastra Assembly Elections 2024: पक्षांतर्गत बंडाळीच्या धोक्यामुळे महायुती, मविआकडून सावध पवित्रा

नागरिकत्व कायद्यातील अनुच्छेद '६ए' वैध; सर्वोच्च न्यायालयाचा बहुमताने निर्वाळा