पोस्ट ऑफिसचा होणार डिजिटल कायापालट; पोस्टात ऑगस्टपासून सुरू होणारी 'ही' नवी सुविधा तुमचे काम करणार सोपे!

डिजिटल इंडियाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलत भारतातील डाकघर म्हणजेच पोस्ट ऑफिस ऑगस्ट 2025 पासून काउंटरवर डिजिटल पेमेंट स्वीकारू लागतील. यासाठी पोस्ट विभाग एक नवीन IT सिस्टम आणि विशेष मोबाइल अ‍ॅप्लिकेशन विकसित करत आहे. सध्या पोस्ट ऑफिसमधील खाती यूपीआय (UPI) प्रणालीशी जोडलेली नसल्याने डिजिटल व्यवहार होऊ शकत नाहीत.
पोस्ट ऑफिसचा होणार डिजिटल कायापालट; पोस्टात ऑगस्टपासून सुरू होणारी 'ही' नवी सुविधा तुमचे काम करणार सोपे!
Published on

डिजिटल इंडियाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलत भारतातील डाकघर म्हणजेच पोस्ट ऑफिस ऑगस्ट 2025 पासून काउंटरवर डिजिटल पेमेंट स्वीकारले जाणार आहे. यासाठी पोस्ट विभाग एक नवीन IT सिस्टम आणि विशेष मोबाइल अ‍ॅप्लिकेशन विकसित करत आहे. सध्या पोस्ट ऑफिसमधील खाती यूपीआय (UPI) प्रणालीशी जोडलेली नसल्याने डिजिटल व्यवहार होऊ शकत नाहीत. मात्र, आता पोस्ट विभाग आपली IT संरचना सुधारत असून, लवकरच ही सुविधा देशभरातील सर्व पोस्ट ऑफिसमध्ये लागू होणार आहे.

कर्नाटकमध्ये सुरू झाली चाचणी -

सध्याच्या पोस्ट ऑफिसमधील खाती UPI प्रणालीशी जोडलेली नसल्याने डिजिटल व्यवहार शक्य नव्हते. मात्र, आता IT इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये मोठे बदल केले जात असून, या नव्या प्रणालीची चाचणी कर्नाटक सर्कलमध्ये सुरू झाली आहे. मैसूर आणि बागलकोट येथील मुख्य पोस्ट ऑफिस तसेच त्यांच्याशी संलग्न ऑफिसमध्ये QR कोडद्वारे मेल बुकिंग यशस्वीरीत्या पार पडली आहे. यापूर्वीही पोस्ट काउंटरवर स्थिर QR कोड बसवून डिजिटल व्यवहार सुरू करण्याचा प्रयत्न झाला होता. पण, तांत्रिक अडचणी आणि ग्राहकांच्या तक्रारींमुळे ती योजना थांबवावी लागली होती. यावेळी मात्र पोस्ट विभाग नव्या तंत्रज्ञानाद्वारे त्या त्रुटी दूर करत आहे.

पोस्ट ऑफिस प्रणालीत नवीन बदल कोणता?

डिजिटल पेमेंटसाठी तयार होणाऱ्या नव्या प्रणालीत एक विशेष मोबाइल अ‍ॅप्लिकेशन असेल. या अ‍ॅपमधून QR कोड स्कॅन करून थेट UPI व्यवहार करता येणार आहेत. यामुळे ग्राहकांना डाकघरात रोख रक्कम घेऊन जाण्याची आवश्यकता उरणार नाही. व्यवहार जलद गतीने होतील आणि प्रक्रिया पारदर्शक बनेल.

ग्राहकांना कसा होईल फायदा?

डिजिटल पेमेंट सुरू झाल्यामुळे डाकघरातील बचत योजना, विमा प्रीमियम, आरडी किंवा मनी ऑर्डर यांसारखे व्यवहार अधिक सुलभ होतील. ग्राहकांना रांगेत उभं राहावं लागणार नाही, पावती भरण्याचा त्रास टळेल आणि त्याचबरोबर वेळेची बचत होईल. डाकघर अधिक आधुनिक, सोयीस्कर आणि ग्राहकाभिमुख बनतील.

डिजिटल इंडिया मोहिमेला नवी चालना

ही सुविधा देशाच्या सर्व भागांतील, अगदी दुर्गम पोस्ट ऑफिसपर्यंत पोहोचवण्याचा सरकारचा उद्देश आहे. यामुळे डिजिटल सेवांचा लाभ ग्रामीण भागांतील लोकांनाही मिळणार आहे. पोस्ट ऑफिस हे केवळ पत्र किंवा पार्सलची जागा राहणार नसून, ते एक आधुनिक डिजिटल सेवा केंद्र म्हणून कार्य करणार आहेत.

logo
marathi.freepressjournal.in