...तर UPI खाते होणार बंद; GPay, PhonePe वापरकर्त्यांसाठी १ ऑगस्टपासून नवे नियम लागू

१ ऑगस्ट २०२५ पासून UPI वापरकर्त्यांसाठी मोठे बदल लागू होणार आहेत. UPI प्रणालीला अधिक वेगवान, सुरक्षित आणि विश्वासार्ह बनवण्यासाठी NPCI ने (National Payments Corporation of India) काही महत्त्वाचे नियम जाहीर केले आहेत. या नवीन बदलांमुळे वापरकर्त्यांना अधिक सहज आणि सुरक्षित पेमेंट अनुभव मिळेल.
...तर UPI खाते होणार बंद; GPay, PhonePe वापरकर्त्यांसाठी १ ऑगस्टपासून नवे नियम लागू
Published on

१ ऑगस्ट २०२५ पासून UPI वापरकर्त्यांसाठी मोठे बदल लागू होणार आहेत. UPI प्रणालीला अधिक वेगवान, सुरक्षित आणि विश्वासार्ह बनवण्यासाठी NPCI ने (National Payments Corporation of India) काही महत्त्वाचे नियम जाहीर केले आहेत. या नवीन बदलांमुळे वापरकर्त्यांना अधिक सहज आणि सुरक्षित पेमेंट अनुभव मिळेल. त्याचसोबत, UPI प्रणालीवर होणाऱ्या वाढत्या ताणावर नियंत्रण ठेवण्याचा महत्त्वपूर्ण उद्देश आहे. हे नियम Google Pay, PhonePe, Paytm यांसारख्या सर्व UPI अ‍ॅप्ससाठी लागू असतील.

बदल खालीलप्रमाणे आहेत -

१. बँक बॅलन्स तपासणीसाठी मर्यादा

१ ऑगस्टपासून प्रत्येक UPI अ‍ॅपमध्ये दिवसाला फक्त ५० वेळा बॅलन्स चेक करण्याची परवानगी असेल. उदाहरणार्थ, तुम्ही GPay आणि PhonePe दोन्ही अ‍ॅप्स वापरत असाल, तर प्रत्येक अ‍ॅपसाठी स्वतंत्र ५० वेळा बॅलन्स तपासता येईल. यामुळे मुख्य वेळेत होणारी वारंवार चौकशी आणि बँकेवरील ताण कमी होईल.

२. लिंक केलेले बँक खाते पाहण्यावर मर्यादा

UPI अ‍ॅप्समध्ये दिवसाला फक्त २५ वेळा लिंक केलेली बँक खाती पाहता येतील. यामध्ये खात्यांची यादी पाहणे किंवा खात्यांमध्ये स्विच करणे यांचा समावेश आहे. यामुळे तांत्रिक भार कमी होईल आणि UPI सेवा अधिक कार्यक्षम होईल.

३. Autopay व्यवहारांसाठी वेळ निश्चित

OTT सबस्क्रिप्शन, युटिलिटी बिल्स, EMI यांसारख्या Autopay व्यवहारांसाठी एक ठराविक वेळ निश्चित करण्यात आलेला आहे:

  • सकाळी १०:०० वाजेपूर्वी

  • दुपारी १:०० ते ५:०० वाजेपर्यंत

  • रात्री ९:३० नंतर

यामुळे मुख्य वेळेतील सर्व्हर लोड कमी होईल आणि UPI सेवा जलद व कार्यक्षम होईल.

४. व्यवहाराची स्थिती तपासण्यावर मर्यादा

अयशस्वी किंवा प्रलंबित असलेल्या व्यवहाराची स्थिती तपासण्यासाठी मर्यादा लावण्यात आलेली आहे. वापरकर्त्यांना दिवसाला फक्त ३ वेळा स्थिती तपासता येईल आणि प्रत्येक तपासणीमध्ये किमान ९० सेकंदांचे अंतर ठेवले जाईल. यामुळे सर्व्हरवरील लोड कमी होईल आणि इतर वापरकर्त्यांना जलद प्रतिसाद मिळू शकेल.

५. व्यवहार रकमेवरील मर्यादा

UPI मधून प्रत्येक व्यवहाराची कमाल रक्कम १ लाख रुपये कायम ठेवली जाणार आहे. मात्र, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रातील व्यवहारांसाठी ही मर्यादा ५ लाख रुपये राहील.

६. निष्क्रिय मोबाईल नंबरसाठी UPI बंद होणार

जर तुमचा UPI लिंक केलेला मोबाईल नंबर ९० दिवस सतत निष्क्रिय राहिला, तर तुमचं UPI खाते सुरक्षा कारणास्तव आपोआप बंद होईल. त्यामुळे दर तीन महिन्यांनी किमान एकदातरी UPI नंबर वापरण्याचा सल्ला NPCI ने दिला आहे.

नवीन नियमांचा उद्देश

UPI प्रणालीवरील अनावश्यक भार कमी करणे, सर्व्हर स्थिर ठेवणे, आणि वापरकर्त्यांना अधिक सुरक्षित, जलद आणि कार्यक्षम सेवा पुरवणे हा मुख्य उद्देश आहे. NPCI च्या या बदलांमुळे UPI प्रणाली अधिक सक्षम बनणार आहे आणि वापरकर्त्यांना उत्तम अनुभव मिळेल, असे NPCI चे म्हणणे आहे.

logo
marathi.freepressjournal.in