नवी दिल्ली : भारत-अमेरिका द्विपक्षीय व्यापार करारावर चर्चेसाठी ट्रम्प प्रशासनाचे मुख्य वाटाघाटी अधिकारी ब्रेंडन लिंच हे सोमवारी दिल्लीत दाखल झाले.
अमेरिकेचे मुख्य वाटाघाटी अधिकारी उद्या भारताशी चर्चा करणार आहेत. दोन्ही देशांमध्ये कोणत्या स्वरूपाचे करार होऊ शकतात हे या चर्चेत ठरणार आहे. ही सहाव्या फेरीच्या औपचारिक वाटाघाटी नाहीत, पण व्यापार चर्चेसंदर्भात दिशा ठरवण्याचा प्रयत्न होईल,” असे भारताचे मुख्य वाटाघाटी अधिकारी व वाणिज्य मंत्रालयातील विशेष सचिव राजेश अग्रवाल यांनी सोमवारी सांगितले.
लिंच हे दक्षिण व मध्य आशियासाठी अमेरिकेचे सहाय्यक व्यापार प्रतिनिधी आहेत.