Saif Ali Khan stabbing case : 'महाराष्ट्र देशातील एक सुरक्षित राज्य', प्रफुल्ल पटेल यांची सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणी प्रतिक्रिया

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणावरून राजकारण चांगलचं तापलं आहे. या घटनेचाअनेक सेलिब्रिटि तसेच राजकीय नेत्यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. तसेच घटनेनंतर मुंबईसह महाराष्ट्राच्या सुरक्षेवर प्रश्चचिन्ह उपस्थित केले जात आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी या घटनेवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. पाहा काय म्हणाले...
Saif Ali Khan stabbing case : 'महाराष्ट्र देशातील सुरक्षित राज्य', प्रफुल्ल पटेल यांची सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणी प्रतिक्रिया
Saif Ali Khan stabbing case : 'महाराष्ट्र देशातील सुरक्षित राज्य', प्रफुल्ल पटेल यांची सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणी प्रतिक्रियासोशल मीडिया
Published on

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्या प्रकरणावरून राजकारण चांगलचं तापलं आहे. या घटनेचाअनेक सेलिब्रिटि तसेच राजकीय नेत्यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. तसेच घटनेनंतर मुंबईसह महाराष्ट्राच्या सुरक्षेवर प्रश्चचिन्ह उपस्थित केले जात आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी या घटनेवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

एएनआयने यासंदर्भात एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) पोस्ट केली आहे. प्रफुल्ल पटेल म्हणाले, ''कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल बोलायचे झाल्यास महाराष्ट्र हे देशातील एक सुरक्षित राज्य मानले जाते. मुंबईत सैफ वरील हल्ल्याच्या घटनेविषयी आम्हाल खेद आहे. या प्रकरणावर कारवाई केली जात आहे. तसेच राज्य सरकार आणि पोलीस कठोर कारवाई करण्यास सदैव तत्पर असतात. या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू आहे. सैफ आता स्वस्थ आहे. तो लवकरच बरा होईल, अशी आम्ही आशा करतो. मात्र, एका घटनेमुळे संपूर्ण राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती बिघडली आहे, असे म्हणणे चुकीचे आहे.''

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अहिल्यानगर, शिर्डी येथे आज अधिवेशन आहे. यासाठी प्रफुल्ल पटेल अन्य नेत्यांसह शिर्डीत उपस्थित आहे. त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. त्यापूर्वी अजित पवार यांनी शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेतले.

सैफ वर एका अज्ञात व्यक्तीने घरात घुसून हल्ला केला. त्यानंतर ही बातमी संपूर्ण देशभरात वाऱ्यासारखी पसरली. बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी या घटनेवर तीव्र शब्दात प्रतिक्रिया नोंदवली. तर विरोधकांनी सरकारला या घटनेवरून चांगलेच धारेवर धरले. त्यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आघाडीवर आहेत. या घटनेनंतर राऊत तसेच आव्हाड यांनी सरकारवर चांगलाच हल्लाबोल चढवला आहे.

Saif Ali Khan stabbing case Update : सैफवरील हल्ल्याच्या तपासासाठी ३० पथके

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या हल्लखोराचा माग काढून त्याच्या मुसक्या ‌आवळण्यासाठी पोलिसांनी ३० पथके स्थापन केली आहेत, मात्र अद्यापही हल्लेखोराला पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी चौकशीसाठी एका व्यक्तीला ताब्यात घेतले त्याचा सुतारकामाचा व्यवसाय असून त्याने हल्ला होण्यापूर्वी दोन दिवस सैफ याच्या घरी काम केले होते, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

Saif Ali Khan stabbing case : 'महाराष्ट्र देशातील सुरक्षित राज्य', प्रफुल्ल पटेल यांची सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणी प्रतिक्रिया
सैफ अली खान हल्ला प्रकरण : एक जण पोलिसांच्या ताब्यात; चौकशीला सुरूवात
Saif Ali Khan stabbing case : 'महाराष्ट्र देशातील सुरक्षित राज्य', प्रफुल्ल पटेल यांची सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणी प्रतिक्रिया
Saif Ali Khan stabbing case Update : सैफवरील हल्ल्याच्या तपासासाठी ३० पथके; अद्याप कोणालाही अटक नाही

हल्लेखोराचा चेहरा सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसत असून त्याच्याकडे लाल रंगाचा स्कार्फ आणि पाठीवर बॅग असल्याचे फुटेजमध्ये दिसत आहे. तो ‘सतगुरू शरण’ या इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उतरत असल्याचे फुटेजमध्ये दिसत आहे. या फुटेजवरून पोलीस हल्लेखोराचा माग काढत असून अद्याप पोलिसांच्या हाती ठोस काही सापडलेले नाही.

logo
marathi.freepressjournal.in