'कुछ कुछ होता है' फेम सना सईदची 'बुलिमिया' वर मात; काय आहे हा आजार? जाणून घ्या लक्षणे आणि उपचार

Bulimia या विकाराने ग्रस्त अनेक व्यक्तींचे वजन सामान्य असल्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यात तो सहज लक्षात येत नाही. मात्र...
'कुछ कुछ होता है' फेम सना सईदची 'बुलिमिया' वर मात; काय आहे हा आजार? जाणून घ्या लक्षणे आणि उपचार
'कुछ कुछ होता है' फेम सना सईदची 'बुलिमिया' वर मात; काय आहे हा आजार? जाणून घ्या लक्षणे आणि उपचार'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

'कुछ कुछ होता है' आणि 'स्टुडंट ऑफ द इयर' फेम अभिनेत्री सना सईद हिने अनेक वर्षे बुलिमिया (Bulimia) या गंभीर आहारविषयक मानसिक आरोग्याच्या विकाराशी झुंज दिल्यानंतर त्यावर मात केल्याचे सांगितले आहे. तिच्या अनुभवामुळे 'बुलिमिया' म्हणजे नेमका काय आजार, त्याची सुरुवातीची लक्षणे कोणती आणि वेळेत उपचार का महत्त्वाचे आहेत, याबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

सना सईदने सोशल मीडियावर सांगितले की, अनेक वर्षे आपण कोणत्या आजाराचा सामना करत आहोत, हेच माहिती नव्हते. नंतर बुलिमियाविषयी माहिती मिळाल्यानंतर तिने तज्ज्ञांची मदत घेतली आणि आता ती पूर्णपणे बरी झाली असल्याचे सांगितले. याचबरोबर अशा समस्येचा सामना करणाऱ्यांनी संकोच न बाळगता उपचार घ्यावेत, असे आवाहनही तिने केले.

'बुलिमिया' म्हणजे काय?

बुलिमिया नर्वोसा हा आहाराशी संबंधित गंभीर मानसिक आरोग्याचा विकार आहे. या विकारामध्ये व्यक्ती कमी वेळात मोठ्या प्रमाणात अन्न खाते आणि त्यानंतर वजन वाढू नये म्हणून स्वतःहून उलटी करणे, उपवास करणे, अतिव्यायाम करणे किंवा जुलाबाच्या औषधांचा वापर करणे अशा उपायांचा अवलंब करते.

या विकाराने ग्रस्त अनेक व्यक्तींचे वजन सामान्य असल्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यात तो सहज लक्षात येत नाही. मात्र, हा विकार मानसिक ताण, चिंता, कमी आत्मविश्वास आणि शरीराच्या प्रतिमेबाबत असलेल्या नकारात्मक विचारांशी संबंधित असतो.

'ही' लक्षणे दिसत असतील तर दुर्लक्ष करू नका

  • कमी वेळात वारंवार अतिप्रमाणात अन्न खाणे

  • जेवणानंतर स्वतःहून उलटी करणे

  • वजन वाढण्याची सतत भीती वाटणे

  • अन्न खाल्ल्यानंतर उपवास किंवा अतिव्यायाम करणे

  • जेवणानंतर लगेच शौचालयात जाण्याची सवय

  • वारंवार उलटीमुळे गाल किंवा जबडा सुजणे

  • दातांची झीज होणे किंवा संवेदनशीलता वाढणे

  • खाल्ल्यानंतर अपराधीपणा, चिंता किंवा नैराश्य जाणवणे

'कुछ कुछ होता है' फेम सना सईदची 'बुलिमिया' वर मात; काय आहे हा आजार? जाणून घ्या लक्षणे आणि उपचार
प्रसूतीनंतर सतत चिंता वाटतेय? नैराश्याची असू शकते सुरुवात; वाचा तज्ज्ञांचा सल्ला

उपचार काय?

तज्ज्ञांच्या मते, बुलिमिया हा उपचार करता येणारा विकार आहे. वेळेत निदान झाल्यास मानसोपचार, विशेषतः कॉग्निटिव्ह बिहेव्हिअरल थेरपी (CBT), आहारतज्ज्ञांचे समुपदेशन आणि गरजेनुसार औषधोपचार यांच्या मदतीने या विकारावर प्रभावी उपचार करता येतात. याशिवाय कुटुंबीयांचा भावनिक आधार आणि मानसिक आरोग्य तज्ज्ञांचे नियमित मार्गदर्शनही तितकेच महत्त्वाचे असते.

'कुछ कुछ होता है' फेम सना सईदची 'बुलिमिया' वर मात; काय आहे हा आजार? जाणून घ्या लक्षणे आणि उपचार
International Yoga Day 2026 : योगामुळे खरंच वजन कमी होतं का? वाचा तज्ज्ञांचे मत

सना सईदचे आवाहन

सना सईदने सांगितले की, योग्य उपचारांमुळे ती आता पूर्णपणे बरी झाली आहे. अशा समस्येचा सामना करणाऱ्यांनी स्वतःला दोष न देता, विश्वासातील व्यक्ती किंवा मानसिक आरोग्य तज्ज्ञांची मदत घ्यावी, असे आवाहन तिने केले आहे.

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in