सोनाक्षी सिन्हाच्या मॉर्फ फोटोंप्रकरणी दिल्लीतील तरुणाला अटक; पण कोर्टाकडून आरोपीची सुटका, नेमकं कारण काय?

Sonakshi Sinha : सोनाक्षीचे काही आक्षेपार्ह मॉर्फ केलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे तिच्या निदर्शनास आले होते. याप्रकरणी तिने पोलिसांत तक्रार दाखल केली.
सोनाक्षी सिन्हाच्या मॉर्फ फोटोंप्रकरणी दिल्लीतील तरुणाला अटक; पण कोर्टाकडून आरोपीची सुटका, नेमकं कारण काय?
सोनाक्षी सिन्हाच्या मॉर्फ फोटोंप्रकरणी दिल्लीतील तरुणाला अटक; पण कोर्टाकडून आरोपीची सुटका, नेमकं कारण काय? (Photo - Instagram)
Published on: 

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचे आक्षेपार्ह मॉर्फ केलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी मुंबईतील वांद्रे पोलिसांनी दिल्लीतील एका तरुणाला अटक केली होती. मात्र, मुंबईतील न्यायालयाने त्याच्या सुटकेचे आदेश दिले आहेत. आरोपीला दिल्लीहून मुंबईत आणताना पोलिसांनी अनिवार्य कायदेशीर प्रक्रियेचे पालन केले नसल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. त्यामुळे आरोपी आर्यन दीपक जैन याला दिलासा मिळाला आहे.

सोनाक्षीच्या तक्रारीनंतर तरुणाला अटक

सोनाक्षीचे काही आक्षेपार्ह मॉर्फ केलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे तिच्या निदर्शनास आले होते. याप्रकरणी तिने पोलिसांत तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर वांद्रे पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. या प्रकरणात दिल्लीतील शाहदरा परिसरातील आर्यन दीपक जैन याला अटक करण्यात आली. १४ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजून ११ मिनिटांनी दिल्लीतील जगतपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून त्याला ताब्यात घेण्यात आले होते.

सोनाक्षी सिन्हाच्या मॉर्फ फोटोंप्रकरणी दिल्लीतील तरुणाला अटक; पण कोर्टाकडून आरोपीची सुटका, नेमकं कारण काय?
Mumbai : चर्चगेट-विरार लोकलमध्ये तरुणींचे चोरून व्हिडीओ काढले, AI वापरून बनवल्या अश्लील रील्स; धक्कादायक प्रकार उघड

दिल्लीतील न्यायालयात हजर न केल्याने पोलिसांच्या प्रक्रियेवर प्रश्न

माध्यमांच्या वृत्तानुसार, आरोपीला दिल्लीहून मुंबईत आणण्यापूर्वी तेथील जवळच्या दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करणे आवश्यक होते. मात्र, पोलिसांनी ही प्रक्रिया पूर्ण न करता आरोपीला थेट वांद्रे न्यायालयात हजर केले, असे निरीक्षण दंडाधिकाऱ्यांनी नोंदवले.

"पोलिसांनी जवळच्या दंडाधिकाऱ्यांसमोर आरोपीला हजर करण्याची प्रक्रिया न पाळता थेट दिल्लीहून या न्यायालयात आणल्याचे दिसते," असे न्यायालयाने नमूद केले.

आरोपीच्या वकिलांकडून अटकेच्या वैधतेवर प्रश्न

आरोपीच्यावतीने वकील अमन शाही, प्रशांत त्रिवेदी आणि आदित्य जैन यांनी बाजू मांडली. त्यांच्या अशिलाने कोणताही गुन्हा केलेला नसल्याचा दावा करत त्याच्यावर लावलेली कायदेशीर कलमे लागू होत नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, तक्रारदार व्यक्ती प्रभावशाली असल्याने पोलिसांच्या कारवाईवर त्याचा परिणाम झाला असण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.

कायदेशीर तरतुदींचे पालन न झाल्याने सुटकेचे आदेश

न्यायालयाने भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या (BNSS) कलम ३५(१) (ब) मधील तरतुदींचाही उल्लेख केला. या तरतुदीनुसार, अटक करण्याची आवश्यकता का आहे, याची कारणे तपास अधिकाऱ्याने नोंदवणे आवश्यक असते. मात्र, या प्रकरणात या प्रक्रियेचे समाधानकारक पालन झाल्याचे दिसत नसल्याचे न्यायालयाने म्हटले.

सोनाक्षी सिन्हाच्या मॉर्फ फोटोंप्रकरणी दिल्लीतील तरुणाला अटक; पण कोर्टाकडून आरोपीची सुटका, नेमकं कारण काय?
रणवीर, आमीरच्या घराचीही रेकी; टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणी एकूण ८ आरोपी अटकेत

पोलिसांनी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न केल्याचे लक्षात घेत न्यायालयाने आर्यन जैन याच्या सुटकेचे आदेश दिले. त्यामुळे सोनाक्षी सिन्हाच्या मॉर्फ फोटो प्रकरणात अटक झालेल्या आरोपीला न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे.

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)