विजय मुख्यमंत्री होताच अभिनेत्री तृषा कृष्णनची पहिली प्रतिक्रिया चर्चेत; "खूप आनंद झाला..." म्हणत लाजली अभिनेत्री

तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून विजय यांनी शपथ घेतल्यानंतर अभिनेत्री तृषा कृष्णनची पहिली प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. “मी खूप आनंदी आहे,” असं म्हणताना तृषा लाजताना दिसली.
विजय मुख्यमंत्री होताच अभिनेत्री तृषा कृष्णनची पहिली प्रतिक्रिया चर्चेत; "खूप आनंद झाला..." म्हणत लाजली अभिनेत्री
Published on

तमिळनाडूमध्ये अभिनेता-राजकारणी विजय यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अभिनेत्री तृषा कृष्णन पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. विजय यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहिलेल्या तृषाने माध्यमांशी बोलताना दिलेली प्रतिक्रिया आणि तिच्या चेहऱ्यावरचा आनंद सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

चेन्नईतील जवाहरलाल नेहरू इनडोअर स्टेडियममध्ये रविवारी पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यात तृषा कृष्णन आई उमा कृष्णन यांच्यासोबत उपस्थित होती. निळ्या रंगाच्या सिल्क साडी आणि गजरा माळून पारंपरिक लूकमध्ये तृषाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

“I am very happy” म्हणत दिली प्रतिक्रिया

शपथविधी सोहळ्यानंतर स्टेडियमबाहेर येताना पत्रकारांनी विजय मुख्यमंत्री झाल्याबद्दल तिची प्रतिक्रिया विचारली. यावेळी तृषा हसताना आणि लाजताना दिसली. "मी खूप आनंदी आहे," अशी प्रतिक्रिया तिने दिली. तसेच तमिळनाडूतील जनतेसाठी काही संदेश आहे का, असा प्रश्न विचारल्यावर तिने "अभिनंदन" एवढंच उत्तर दिलं.

नात्याच्या चर्चांना पुन्हा उधाण

विजय आणि तृषा कृष्णन यांच्याबाबत गेल्या काही महिन्यांपासून रिलेशनशिपच्या चर्चा रंगत आहेत. फेब्रुवारी महिन्यात विजय आणि त्यांच्या पत्नी संगीता सोर्नलिंगम यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनंतर तृषाचं नाव सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आलं होतं.

मार्च महिन्यात चेन्नईतील एका लग्न समारंभात विजय आणि तृषा एकसारख्या क्रीम-गोल्ड पोशाखात दिसल्यानंतर या चर्चांना आणखी हवा मिळाली होती.

मतदानाच्या दिवशीही झाली होती चर्चा

२३ एप्रिल रोजी मतदान केल्यानंतर तृषाने सोशल मीडियावर शाई लावलेल्या बोटाचा फोटो शेअर केला होता. मात्र, त्या पोस्टवर तिने विजय आणि तिच्या ‘घिल्ली’ चित्रपटातील ‘अर्जुनर विल्लू’ हे गाणं वापरल्यामुळे सोशल मीडियावर अनेक चर्चा रंगल्या होत्या. दरम्यान, विजय किंवा तृषा या दोघांकडूनही त्यांच्या नात्याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

logo
marathi.freepressjournal.in