Aadhaar Security Tips : आधार फ्रॉडची भीती? फक्त २ मिनिटांत लॉक करा बायोमेट्रिक डेटा; जाणून घ्या सोपी पद्धत

आधार सुरक्षित ठेवण्यासाठी UIDAI च्या Biometric Lock फीचरचा वापर करा. फिंगरप्रिंट आणि आयरिस डेटा लॉक करण्याची सोपी पद्धत, त्याचे फायदे आणि कोणत्या व्यवहारांवर याचा परिणाम होतो, जाणून घ्या.
Aadhaar Security Tips : आधार फ्रॉडची भीती? फक्त २ मिनिटांत लॉक करा बायोमेट्रिक डेटा; जाणून घ्या सोपी पद्धत
Aadhaar Security Tips : आधार फ्रॉडची भीती? फक्त २ मिनिटांत लॉक करा बायोमेट्रिक डेटा; जाणून घ्या सोपी पद्धत'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

आधार कार्ड आज जवळपास प्रत्येक महत्त्वाच्या कामासाठी वापरलं जातं. बँक खाते, पॅन कार्ड, मोबाईल सिम, ईपीएफ, सरकारी योजना अशा अनेक सेवांशी आधार जोडलेला असल्याने त्याची सुरक्षितता अधिक महत्त्वाची ठरते. अशा परिस्थितीत आधारशी संबंधित फसवणुकीपासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी UIDAI ने दिलेलं Biometric Lock फीचर उपयुक्त ठरू शकतं. या सुविधेमुळे तुमचे फिंगरप्रिंट आणि आयरिस (डोळ्यांचे स्कॅन) लॉक करता येतात, त्यामुळे तुमच्या परवानगीशिवाय कोणीही बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन वापरू शकत नाही.

बायोमेट्रिक लॉक कसं कराल?

UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन Aadhaar Services विभागातील Lock/Unlock Biometrics हा पर्याय निवडा.

त्यानंतर:

  • १२ अंकी आधार क्रमांक टाका.

  • कॅप्चा भरून पुढे जा.

  • नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर आलेला OTP टाका.

  • पडताळणी पूर्ण झाल्यानंतर Biometric Lock सुरू करा.

ही सुविधा mAadhaar अ‍ॅपमधूनही वापरता येते. अ‍ॅपमध्ये लॉगिन केल्यानंतर Biometric Settings मध्ये जाऊन लॉक पर्याय सुरू करता येतो.

Aadhaar Security Tips : आधार फ्रॉडची भीती? फक्त २ मिनिटांत लॉक करा बायोमेट्रिक डेटा; जाणून घ्या सोपी पद्धत
IRCTC Beta Website : नव्या बीटा वेबसाइटची कमाल! तत्काळ तिकीट बुकिंगला वेग, पहिल्या ३ मिनिटांत ५ टक्क्यांहून अधिक यशस्वी बुकिंग

लॉक केल्यानंतर काय होईल?

बायोमेट्रिक लॉक केल्यानंतर तुमचे फिंगरप्रिंट किंवा आयरिस वापरून होणारे आधार ऑथेंटिकेशन बंद होईल. गरज पडल्यास OTP च्या मदतीने ते काही काळासाठी अनलॉक करता येते. काम पूर्ण झाल्यानंतर ते पुन्हा आपोआप लॉक होते.

UPI किंवा नेट बँकिंगवर परिणाम होतो का?

नाही. बायोमेट्रिक लॉक केल्यामुळे UPI, नेट बँकिंग, डेबिट कार्ड किंवा ATM व्यवहारांवर कोणताही परिणाम होत नाही. फक्त आधारवर आधारित बायोमेट्रिक पडताळणीसाठी फिंगरप्रिंट किंवा आयरिस वापरता येत नाही.

हे फीचर महत्त्वाचं का?

काही ठिकाणी Aadhaar Enabled Payment System (AePS) चा वापर करून फिंगरप्रिंटच्या आधारे व्यवहार केले जातात. अशा परिस्थितीत बायोमेट्रिकचा गैरवापर होण्याचा धोका असू शकतो. त्यामुळे बायोमेट्रिक लॉक करून हा धोका मोठ्या प्रमाणात कमी करता येतो.

UIDAI कडून Authentication History तपासण्याची सुविधाही उपलब्ध आहे. त्यामुळे तुमच्या आधारचा वापर कधी आणि कुठे झाला, हेही वेळोवेळी पाहता येते.

Aadhaar Security Tips : आधार फ्रॉडची भीती? फक्त २ मिनिटांत लॉक करा बायोमेट्रिक डेटा; जाणून घ्या सोपी पद्धत
UPI Payment साठी इंटरनेटची गरज नाही! २००० रुपयांपर्यंत ऑफलाइन व्यवहाराची सुविधा, जाणून घ्या...
Aadhaar Security Tips : आधार फ्रॉडची भीती? फक्त २ मिनिटांत लॉक करा बायोमेट्रिक डेटा; जाणून घ्या सोपी पद्धत
टोल नाक्याच्या २० किमी परिसरात राहतात? आता NHAI चा डिजिटल लोकल पास मिळवा RajmargYatra App वरून, जाणून घ्या डिटेल्स

'या' गोष्टीही कायम लक्षात ठेवा

  • कोणालाही OTP सांगू नका.

  • गरज नसताना आधारची झेरॉक्स देऊ नका.

  • शक्य असेल तेथे Masked Aadhaar वापरा.

  • आधारशी संबंधित सेटिंग्ज वेळोवेळी तपासत राहा.

आधार बायोमेट्रिक लॉक करणे म्हणजे घाबरण्याचं कारण नाही, तर सुरक्षिततेसाठी घेतलेलं एक छोटंसं पण महत्त्वाचं पाऊल आहे. वाढत्या सायबर फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर हे फीचर प्रत्येक आधारधारकासाठी उपयुक्त ठरू शकतं.

logo
marathi.freepressjournal.in