Apple चं ‘हॅन्डऑफ’ फीचर लवकरच Android मध्येही? वाचा सविस्तर

स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ॲपलच्या खास हॅन्डऑफ फीचरप्रमाणेच आता गूगलदेखील Android मध्ये असं फीचर आणण्याच्या तयारीत आहे.
Apple चं ‘हॅन्डऑफ’ फीचर लवकरच Android मध्येही? वाचा सविस्तर
Apple चं ‘हॅन्डऑफ’ फीचर लवकरच Android मध्येही? वाचा सविस्तर
Published on

स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ॲपलच्या खास हॅन्डऑफ फीचरप्रमाणेच आता गुगलदेखील Android मध्ये असं फीचर आणण्याच्या तयारीत आहे. यामुळे आयफोन, आयपॅड किंवा मॅकसारखीच वेगवेगळ्या Android डिव्हाइसमध्ये करत असलेले कोणतेही काम अर्धवट न ठेवता अखंडपणे (कंटीन्यू) सुरू ठेवण्याचे शानदार फीचर मिळणार आहे.

ॲपलचं हॅन्डऑफ हे कंट्युनिटी फीचर आहे. उदाहरणार्थ, तुम्ही आयफोनवर एखादा लेख वाचायला सुरुवात केली आणि मध्येच मॅकबुकवर काम करायचं झालं, तर तोच लेख तिथे जिथे सोडला होता तिथून पुढे वाचता येतो. फक्त यासाठी सर्व डिव्हाइस एकाच आयक्लाऊड अकाउंटवर लॉग-इन असणं आवश्यक आहे. यामुळे कॉल, नोट्स, ब्राउझर टॅब्स किंवा इतर ॲप्स अगदी सहज एका डिव्हाइसवरून दुसऱ्यावर स्विच करता येतात.

'क्रॉस-डिव्हाइस सर्व्हिसेस' फीचर नेमकं आहे तरी काय?

Android अथॉरिटीच्या अहवालानुसार गुगल हेच फिचर 'क्रॉस-डिव्हाइस सर्व्हिसेस' या नावाने आणणार आहे. हे Android 16 ऑपरेटिंग सिस्टममध्ये उपलब्ध होईल. यात कॉल कास्टिंग, इंटरनेट शेअरिंग, नोटिफिकेशन सिंकिंग, फाईल शेअरिंग आणि ॲपची कंट्युनिटी राखणारे अनेक पर्याय मिळतील. फोनवरून टॅबलेट किंवा लॅपटॉपवर स्विच करताना टास्कबारवर सुचवलेला पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करताच ॲप तसाच उघडेल.

हे फीचर सुरू झाल्यावर Android वापरकर्त्यांना कामाची गती आणि सोय दोन्ही मिळणार आहेत. वेगवेगळ्या डिव्हाइसवर एकाच कामाची सलगता राखता येणार असल्यामुळे कामात खंड न पडता डिजिटल अनुभव अधिक सहज आणि स्मार्ट होणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in