Ashadhi Ekadashi 2026 : नेहमीचे साबुदाणा वडे नकोत? यंदा उपवासासाठी झटपट बनवा कुरकुरीत साबुदाणा अप्पे

आषाढी एकादशीच्या उपवासासाठी नेहमीचे वडे किंवा खिचडीऐवजी झटपट तयार होणारे कुरकुरीत साबुदाणा अप्पे बनवा. साहित्य, कृती आणि परफेक्ट अप्पे बनवण्याच्या टिप्स जाणून घ्या.
Ashadhi Ekadashi 2026 : नेहमीचे साबुदाणा वडे नकोत? यंदा उपवासासाठी झटपट बनवा कुरकुरीत साबुदाणा अप्पे
Ashadhi Ekadashi 2026 : नेहमीचे साबुदाणा वडे नकोत? यंदा उपवासासाठी झटपट बनवा कुरकुरीत साबुदाणा अप्पे
Published on

आषाढी एकादशीचा उपवास म्हटलं की साबुदाण्याचे विविध पदार्थ हमखास बनवले जातात. मात्र, यावेळी नेहमीच्या साबुदाणा खिचडी, वडे किंवा थालीपीठाऐवजी काहीतरी वेगळं ट्राय करायचं असेल, तर साबुदाणा अप्पे हा उत्तम पर्याय ठरू शकतो. बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ असलेले हे अप्पे कमी तेलात तयार होतात आणि चवीलाही तितकेच भन्नाट लागतात.

उपवासासाठी साबुदाणा अप्पे का करावेत?

साबुदाणा अप्पे हा उपवासातील हलका, पोटभरीचा आणि झटपट तयार होणारा पदार्थ आहे. अप्पे पात्रात बनत असल्याने ते डीप फ्राय करण्याची गरज लागत नाही. त्यामुळे कमी तेलातही हा पदार्थ चविष्ट आणि कुरकुरीत तयार होतो.

साहित्य

  • १ कप साबुदाणा (४ ते ५ तास भिजवलेला)

  • १ मध्यम आकाराचा उकडलेला बटाटा

  • १ टीस्पून जिरे

  • २ हिरव्या मिरच्या (बारीक चिरलेल्या)

Ashadhi Ekadashi 2026 : नेहमीचे साबुदाणा वडे नकोत? यंदा उपवासासाठी झटपट बनवा कुरकुरीत साबुदाणा अप्पे
जेवताना तोंडी लावण्यासाठी बनवा खमंग वांगी तवा फ्राय; १० मिनिटांत होईल झटपट तयार
  • अर्धा कप शेंगदाण्याचे कूट

  • चवीनुसार सैंधव मीठ

  • बारीक चिरलेली कोथिंबीर

  • चिली फ्लेक्स (ऐच्छिक)

  • तेल

कृती

सर्वप्रथम साबुदाणा स्वच्छ धुवून ४ ते ५ तास भिजत ठेवा. साबुदाणा मऊ झाल्यानंतर त्यात उकडलेला बटाटा किसून घाला.

यानंतर जिरे, हिरवी मिरची, शेंगदाण्याचे कूट, सैंधव मीठ, कोथिंबीर आणि आवडीनुसार चिली फ्लेक्स घालून मिश्रण चांगले एकजीव करा.

हाताला थोडे तेल लावून या मिश्रणाचे छोटे गोळे तयार करा.

अप्पे पात्राला हलके तेल लावून गरम करा. त्यात तयार गोळे ठेवून झाकण लावा आणि मंद आचेवर ५ मिनिटे शिजवा.

त्यानंतर अप्पे उलटून दुसरी बाजूही सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत शिजवा.

गरमागरम साबुदाणा अप्पे हिरवी चटणी, दह्याची चटणी किंवा शेंगदाण्याच्या आमटीसोबत सर्व्ह करा.

Ashadhi Ekadashi 2026 : नेहमीचे साबुदाणा वडे नकोत? यंदा उपवासासाठी झटपट बनवा कुरकुरीत साबुदाणा अप्पे
फक्त कांदा, ब्रेड आणि चीज... ५ मिनिटांत तयार होईल खमंग तवा सॅण्डविच; पावसाळ्यात नक्की ट्राय करा

परफेक्ट साबुदाणा अप्पेसाठी टिप्स

  • अप्प्यांना योग्य बाइंडिंग मिळण्यासाठी उकडलेला बटाटा चांगला मॅश करून वापरा.

  • बटाट्याचे प्रमाण जास्त ठेवू नका. त्यामुळे अप्पे मऊ किंवा चिवट होऊ शकतात.

  • मिश्रण तयार करताना अतिरिक्त पाणी अजिबात घालू नका.

  • अप्पे मंद आचेवर शिजवल्यास ते बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ होतात.

logo
marathi.freepressjournal.in