
आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत रात्री शांत झोप मिळणे अनेकांसाठी आव्हान ठरले आहे. दिवसभर कामाचा ताण, इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर आणि मानसिक चिंता या सगळ्यामुळे झोपेचे चक्र विस्कळीत होते. अशा परिस्थितीत, झोपण्यापूर्वी ग्रीन टी पिणे हे फक्त मनाला आराम देत नाही, तर शरीरासाठीही अनेक आरोग्यदायी फायदे देते.
ग्रीन टीमध्ये असलेले एल-थेनाइन नावाचे अमिन ॲसिड झोप सुधारते आणि तणाव कमी करते. यामुळे दिवसभराचा थकवा प्रभावीपणे निघून जातो.
रात्री ग्रीन टीचे सेवन केल्यास हृदय निरोगी राहते. हे शरीरातील जमा चरबी कमी करते, एलडीएल कोलेस्ट्रॉल कमी ठेवते, ट्रायग्लिसराइड्स नियंत्रित करते आणि हृदयघाताचा धोका कमी करतो.
बदललेल्या जीवनशैलीमुळे वाढलेल्या मानसिक ताणामुळे अनेकांना डिप्रेशन आणि चिंता अनुभवावी लागते. ग्रीन टीमध्ये असलेले एल-थेनाइन डिप्रेशनशी लढण्यास मदत करते.
झोपण्यापूर्वी ग्रीन टी पिल्याने वजन नियंत्रित राहते, कॅलरीज बर्न होतात, पचन सुधारते, रक्तातील साखरेची पातळी संतुलित राहते आणि अपचन, बद्धकोष्ठता व ऍसिडिटी सारख्या समस्या कमी होतात.
अँटीऑक्सिडंट्सनी समृद्ध ग्रीन टी कोलेस्टेरॉल कमी करते, उच्च रक्तदाब संतुलित ठेवते आणि शरीराला फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण देते.
रात्री झोपण्यापूर्वी एक कप ग्रीन टी प्यायल्यास तुम्हाला फक्त चांगली झोप मिळत नाही, तर वजन, हृदयाचे आरोग्य, तणाव आणि कोलेस्टेरॉल सुद्धा नियंत्रित राहतात. ही एक सोपी, नैसर्गिक आणि प्रभावी आरोग्यसंपन्न सवय म्हणून दैनंदिन जीवनात समाविष्ट करणे अत्यंत फायदेशीर ठरते.
(Disclaimer: या माहितीमध्ये दिलेले आरोग्यविषयक सल्ले सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. याची ‘नवशक्ति’ पुष्टी करत नाही.)