महिलांसाठी सुपरफूड! आताच जाणून घ्या कसुरी मेथीचे हे ५ जबरदस्त फायदे

आपल्या स्वयंपाकघरात असलेले काही मसाले फक्त चव वाढवण्यासाठी नसून ते आरोग्यासाठीही खूप फायदेशीर ठरतात. त्यापैकीच एक म्हणजे कसुरी मेथी. आयुर्वेदामध्ये सांगितलय...
महिलांसाठी सुपरफूड! आताच जाणून घ्या कसुरी मेथीचे हे ५ जबरदस्त फायदे
Published on

दररोजच्या आहारात थोडेसे बदल मोठा फरक घडवू शकतात. आपल्या स्वयंपाकघरात असलेले काही मसाले फक्त चव वाढवण्यासाठी नसून ते आरोग्यासाठीही खूप फायदेशीर ठरतात. त्यापैकीच एक म्हणजे कसुरी मेथी. आयुर्वेदामध्ये तिचे अनेक औषधी गुणधर्म सांगितले आहेत.

कसुरी मेथीचे आरोग्यदायी फायदे

सतत पचनाचे त्रास, गॅस किंवा पोटातील इन्फेक्शन होत असेल तर कसुरी मेथी उपयोगी ठरते. ती आतड्यांचं आरोग्य सुधारते आणि हृदयविकारांपासूनही संरक्षण देते.

स्तनपान करणाऱ्या आईंसाठी तर कसुरी मेथी अत्यंत फायदेशीर आहे. कारण ती आईच्या दूधाचे प्रमाण वाढवण्यास मदत करते. महिलांमध्ये सर्वसाधारणपणे दिसणारा अॅनिमियाचा त्रासही यामुळे कमी होतो. कसुरी मेथी रक्त वाढवते आणि शरीराला ताकद देते.

त्याचबरोबर शरीरातील हार्मोनल बदल नियंत्रणात ठेवण्यासाठी कसुरी मेथी उपयुक्त आहे. त्यामुळे होणारे त्रास कमी होतात आणि शरीराची समतोल स्थिती टिकते. तसेच मधुमेहींसाठीही ती फायदेशीर आहे. टाईप २ मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.

महिलांसाठी सुपरफूड! आताच जाणून घ्या कसुरी मेथीचे हे ५ जबरदस्त फायदे
दिवसभर एका जागी बसून काम करता? जाणून घ्या आरोग्यावर होणारे परिणाम

म्हणूनच महिलांच्या आहारात कसुरी मेथीचा समावेश करणं अत्यावश्यक आहे. कारण छोट्याशा या पानांमध्ये मोठं आरोग्य दडलं आहे.

(Disclaimer: ही माहितीमध्ये दिलेले आरोग्यविषयक सल्ले सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. याची ‘नवशक्ति’ पुष्टी करत नाही.)

logo
marathi.freepressjournal.in