Bhai Dooj Gift Ideas : भावाला खूश करायचंय? भाऊबीजेसाठी 'या' भेटवस्तू ठरतील परफेक्ट

भावाची आवड, त्याची जीवनशैली आणि गरज लक्षात घेऊन तुम्ही त्याला उपयोगी तसेच हटके भेटवस्तू देऊ शकता.
Bhai Dooj Gift Ideas : भावाला खूश करायचंय? भाऊबीजेसाठी 'या' भेटवस्तू ठरतील परफेक्ट
Bhai Dooj Gift Ideas : भावाला खूश करायचंय? भाऊबीजेसाठी 'या' भेटवस्तू ठरतील परफेक्ट'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on: 

दिवाळीतील भाऊबीज हा भाऊ-बहि‍णीच्या प्रेमाचा आणि जिव्हाळ्याचा सण आहे. या दिवशी बहीण भावाला औक्षण करून त्याच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करते. तर भाऊ बहिणीला भेटवस्तू देऊन तिच्याप्रती असलेले प्रेम व्यक्त करतो. मात्र, या सणाला बहिणींकडूनही भावाला एखादे खास गिफ्ट देण्याची पद्धत आता लोकप्रिय होत आहे. अशावेळी भावाला नेमके काय गिफ्ट द्यावे, असा प्रश्न अनेक बहिणींना पडतो. भावाची आवड, त्याची जीवनशैली आणि गरज लक्षात घेऊन तुम्ही त्याला उपयोगी तसेच हटके भेटवस्तू देऊ शकता. यंदाच्या भाऊबीजेला भावाला काय गिफ्ट द्यावे, यासाठी काही खास पर्याय जाणून घेऊया.

भावासाठी खास गिफ्ट आयडिया

१. स्मार्टवॉच : तुमचा भाऊ फिटनेसची आवड असणारा असेल किंवा टेक्नॉलॉजीची आवड असेल तर त्याला स्मार्टवॉच भेट देऊ शकता. यामुळे वेळ पाहण्यासोबतच आरोग्य आणि फिटनेसवरही लक्ष ठेवता येईल.

Bhai Dooj Gift Ideas : भावाला खूश करायचंय? भाऊबीजेसाठी 'या' भेटवस्तू ठरतील परफेक्ट
Diwali Gift Ideas 2026 : दिवाळीत सोनपापडीऐवजी प्रियजनांना द्या 'या' हटके भेटवस्तू; कमी बजेटमध्ये खास सरप्राईज

२. वॉलेट किंवा बेल्ट : रोजच्या वापरातील एखादी वस्तू गिफ्ट करायची असेल तर आकर्षक वॉलेट किंवा बेल्ट हा चांगला पर्याय आहे. भावाच्या आवडीचा रंग आणि डिझाइन निवडून तुम्ही त्याला ही भेट देऊ शकता.

३. वायरलेस इअरबड्स : गाणी ऐकण्याची, चित्रपट पाहण्याची किंवा सतत फोनवर बोलण्याची आवड असलेल्या भावासाठी वायरलेस इअरबड्स उत्तम गिफ्ट ठरू शकतात.

४. आवडीचा परफ्यूम : भावाला खास आणि स्टायलिश गिफ्ट द्यायचे असेल तर त्याच्या आवडीचा परफ्यूम निवडा. रोजच्या वापरासाठी किंवा खास प्रसंगांसाठी वेगवेगळ्या फ्रॅग्रन्सचे पर्याय उपलब्ध आहेत.

Bhai Dooj Gift Ideas : भावाला खूश करायचंय? भाऊबीजेसाठी 'या' भेटवस्तू ठरतील परफेक्ट
Diwali Beauty Gifts : दिवाळीच्या भेटवस्तूंसाठी बेस्ट पर्याय! प्रसिद्ध ब्रँड्सचे खास ब्युटी गिफ्ट सेट्स एकदा पाहाच

५. ग्रूमिंग किट : स्वतःच्या लुकची आणि व्यक्तिमत्त्वाची काळजी घेणाऱ्या भावाला ग्रूमिंग किट भेट देऊ शकता. यामध्ये ट्रिमर, फेसवॉश, दाढीची निगा राखणारी उत्पादने किंवा स्किनकेअर वस्तूंचा समावेश करू शकता.

६. पर्सनलाइज्ड फोटो फ्रेम : भाऊ-बहि‍णीच्या नात्यातील खास आठवणी जपायच्या असतील तर दोघांचा एखादा सुंदर फोटो फ्रेम करून द्या. त्यावर एखादा खास संदेश लिहिल्यास या भेटीला आणखी भावनिक स्पर्श मिळेल.

७. आवडत्या ब्रँडचे कपडे : भावाला फॅशनची आवड असेल तर त्याच्यासाठी शर्ट, टी-शर्ट, जॅकेट किंवा कुर्ता खरेदी करू शकता. त्याच्या आवडीच्या स्टाइलनुसार कपड्यांची निवड करा.

Bhai Dooj Gift Ideas : भावाला खूश करायचंय? भाऊबीजेसाठी 'या' भेटवस्तू ठरतील परफेक्ट
Diwali 2026 : दिवाळीत मिठाई खाताना सावधान! भेसळ ओळखण्यासाठी करा 'या' महत्त्वाच्या गोष्टी

८. फिटनेस ॲक्सेसरीज : जिमला जाणाऱ्या किंवा व्यायामाची आवड असणाऱ्या भावाला जिम बॅग, स्पोर्ट्स शूज, फिटनेस बँड किंवा पाण्याची चांगली बाटली भेट देऊ शकता.

९. आवडत्या गोष्टींचे गिफ्ट हॅम्पर : भावाला चॉकलेट्स, स्नॅक्स, कॉफी किंवा पुस्तके आवडत असतील तर त्याच्या आवडीच्या वस्तूंचा सुंदर गिफ्ट हॅम्पर तयार करा. स्वतःच्या हाताने तयार केलेले हे गिफ्ट त्याला नक्कीच आवडेल.

१०. सरप्राइज आउटिंग : वस्तूंपेक्षा आठवणी जपायला आवडत असतील तर भावाला चित्रपट, आवडत्या रेस्टॉरंटमध्ये जेवण किंवा एखाद्या खास ठिकाणी फिरायला घेऊन जा. एकत्र घालवलेला वेळ हीदेखील सुंदर भेट ठरू शकते.

Bhai Dooj Gift Ideas : भावाला खूश करायचंय? भाऊबीजेसाठी 'या' भेटवस्तू ठरतील परफेक्ट
Diwali 2026 : फटाके फोडताना पर्यावरणाचीही काळजी घ्या; सुरक्षित अन् प्रदूषणमुक्त दिवाळीसाठी लक्षात ठेवा 'या' गोष्टी

भाऊबीजेला दिलेल्या भेटवस्तूची किंमत किती आहे, यापेक्षा त्यामागची भावना अधिक महत्त्वाची असते. त्यामुळे भावाच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन दिलेले छोटेसे गिफ्टही त्याच्यासाठी खास ठरू शकते.

(संबधित इंग्रजी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)