Diwali 2026 : दिवाळीत मिठाई खाताना सावधान! भेसळ ओळखण्यासाठी करा 'या' महत्त्वाच्या गोष्टी

Diwali Sweets Safety Tips : भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) दिलेल्या माहितीनुसार, काही सामान्य भेसळीचे घटक घरच्या घरी प्राथमिक चाचण्यांद्वारे तपासता येतात. जाणून घेऊया या सोप्या पद्धती.
Diwali 2026 : दिवाळीत मिठाई खाताना सावधान! खाण्याआधी तपासा 'या' महत्त्वाच्या गोष्टी
Diwali 2026 : दिवाळीत मिठाई खाताना सावधान! खाण्याआधी तपासा 'या' महत्त्वाच्या गोष्टी'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on: 

दिवाळीचा सण म्हटला की फराळासोबतच मिठाईचीही रेलचेल असते. काजू कतली, लाडू, बर्फी, पेढे अशा विविध मिठाईंची देवाणघेवाण केली जाते. सणानिमित्त नातेवाईक, मित्रपरिवार आणि ओळखीच्या व्यक्तींकडून मिठाईचे बॉक्स भेट म्हणून मिळतात. मात्र, आकर्षक पॅकिंगमध्ये मिळालेली मिठाई शुद्ध घटकांपासून बनवलेली आहे की त्यात भेसळ करण्यात आली आहे, हे ओळखणे सहज शक्य नसते. विशेषतः दुग्धजन्य पदार्थांपासून बनवलेल्या मिठाईमध्ये भेसळीचा धोका असू शकतो. त्यामुळे मिठाई खाण्यापूर्वी तिच्या गुणवत्तेकडे लक्ष देणे गरजेचे आहे. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) दिलेल्या माहितीनुसार, काही सामान्य भेसळीचे घटक घरच्या घरी प्राथमिक चाचण्यांद्वारे तपासता येतात. जाणून घेऊया या सोप्या पद्धती.

Diwali 2026 : दिवाळीत मिठाई खाताना सावधान! खाण्याआधी तपासा 'या' महत्त्वाच्या गोष्टी
Diwali Faral Tips : करंजी फुटू नये, सारण बाहेर येऊ नये; बनवताना लक्षात ठेवा 'या' टिप्स

मिठाई खरेदी करताना 'या' गोष्टी तपासा

दिवाळीच्या काळात मिठाईला मोठी मागणी असते. त्यामुळे मिठाई उत्पादक आणि विक्रेत्यांवर मोठ्या प्रमाणात ऑर्डर पूर्ण करण्याचा दबाव असतो. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये पाणी, स्टार्च, डिटर्जंट, युरिया यांसारख्या घटकांची भेसळ होण्याची शक्यता असते. काही घटक पदार्थांचे प्रमाण वाढवण्यासाठी, तर काही पदार्थांचे उत्पादन खर्च कमी करण्यासाठी मिसळले जाऊ शकतात.

Diwali 2026 : दिवाळीत मिठाई खाताना सावधान! खाण्याआधी तपासा 'या' महत्त्वाच्या गोष्टी
Diwali Sweet Recipe : केशराचा सुगंध अन् खव्याची चव; दिवाळीसाठी बनवा खास मलाई पेढे

मिठाईचा बॉक्स खरेदी करताना किंवा भेट मिळाल्यानंतर काही गोष्टी तपासणे आवश्यक आहे.

  • निर्मिती आणि एक्सपायरी डेट पाहा : मिठाईच्या पॅकिंगवर उत्पादनाची तारीख आणि वापरण्याची अंतिम तारीख तपासा. मुदत संपलेली मिठाई खाणे टाळा.

  • अवाजवी सवलतींपासून सावध राहा : बाजारभावापेक्षा खूपच कमी किमतीत मिळणाऱ्या मिठाईबाबत सतर्क राहा.

  • विश्वासार्ह दुकानातून खरेदी करा : स्वच्छता राखणाऱ्या आणि विश्वासार्ह विक्रेत्यांकडूनच मिठाई खरेदी करा. विशेषतः दूध आणि खव्यापासून बनवलेल्या पदार्थांच्या बाबतीत काळजी घ्या.

  • चांदीचा वर्ख तपासा : मिठाईवर लावण्यात येणारा चांदीचा वर्ख खरा आहे की त्याऐवजी अ‍ॅल्युमिनियम फॉइल वापरले आहे, याकडेही लक्ष द्या.

Diwali 2026 : दिवाळीत मिठाई खाताना सावधान! खाण्याआधी तपासा 'या' महत्त्वाच्या गोष्टी
Smoothie Recipe : फळं, दही अन् बदाम; पौष्टिक स्मूदी बनवण्यासाठी फॉलो करा 'ही' सोपी रेसिपी

मिठाईतील भेसळ ओळखण्यासाठी घरच्या घरी करा 'या' ३ चाचण्या

१. स्टार्चची भेसळ तपासा

मिठाईमध्ये स्टार्च मिसळले आहे की नाही, हे तपासण्यासाठी आयोडीन द्रावणाचा वापर करता येतो. यासाठी मिठाईचा थोडासा भाग पाण्यात विरघळवून घ्या. त्यानंतर या मिश्रणात आयोडीन द्रावणाचे काही थेंब टाका. मिश्रणाचा रंग निळसर-जांभळा झाल्यास त्यामध्ये स्टार्च असण्याची शक्यता असते.

२. डिटर्जंटची भेसळ तपासा

मिठाईमध्ये डिटर्जंटची भेसळ आहे का, हे तपासण्यासाठी मिठाईचा थोडासा भाग पाण्यात मिसळा. त्यानंतर हे मिश्रण जोरात हलवा. असे केल्यानंतर त्यावर दाट फेसाचा थर तयार झाल्यास डिटर्जंटची भेसळ असण्याची शक्यता असू शकते.

Diwali 2026 : दिवाळीत मिठाई खाताना सावधान! खाण्याआधी तपासा 'या' महत्त्वाच्या गोष्टी
Whole Wheat Bread : ब्राऊन ब्रेड खरेदी करताय? फक्त रंग पाहून निवड करू नका; पाकिटावरील 'या' गोष्टीही तपासा

३. चांदीचा वर्ख खरा आहे की बनावट ते तपासा

मिठाईवर सजावटीसाठी चांदीचा वर्ख वापरला जातो. मात्र, काही वेळा चांदीच्या वर्खाऐवजी अ‍ॅल्युमिनियम फॉइल वापरले जाऊ शकते. यासाठी वर्खाचा छोटासा तुकडा चमच्यावर ठेवून गरम करण्याची चाचणी सांगितली जाते. शुद्ध चांदी गरम केल्यावर तिचे लहान चमकदार गोळे तयार होतात, तर अ‍ॅल्युमिनियमची राखाडी रंगाची राख होऊ शकते.

Diwali 2026 : दिवाळीत मिठाई खाताना सावधान! खाण्याआधी तपासा 'या' महत्त्वाच्या गोष्टी
Diwali 2026 : डाएट करणाऱ्यांसाठी दिवाळीत बनवा गुळाची बेसन बर्फी; कमी वेळेत तयार होणारी सोपी रेसिपी

मिठाई खाताना घ्या काळजी

दिवाळीत भेट म्हणून मिळालेली मिठाई लगेच खाण्यापूर्वी तिचे पॅकिंग, उत्पादनाची तारीख आणि मुदत तपासणे महत्त्वाचे आहे. मिठाईचा रंग, वास किंवा चव असामान्य वाटल्यास ती खाणे टाळा. तसेच, घरगुती चाचण्या या केवळ प्राथमिक स्वरूपाच्या असून त्यातून भेसळीची खात्रीशीर पुष्टी होत नाही. मिठाईच्या शुद्धतेबाबत शंका असल्यास अधिकृत अन्न तपासणी प्रयोगशाळेतून तपासणी करून घेणे योग्य ठरते. सणाचा आनंद घेताना स्वतःच्या आणि कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

(संबधित इंग्रजी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)