विमानप्रवासात शरीरावर नेमका काय परिणाम होतो? कार्डिओलॉजिस्टने दिल्या सोप्या पण महत्त्वाच्या टिप्स

विमानप्रवासादरम्यान शरीरावर अनेक सूक्ष्म परिणाम होतात, ज्याची अनेकांना कल्पनाही नसते. ऑक्सिजनचे प्रमाण कमी होणे, हृदयावर ताण येणे आणि शरीरातील पाणी कमी होणे अशा बदलांविषयी कार्डिओलॉजिस्ट डॉ. दिमित्री यारानोव यांनी माहिती दिली असून प्रवासात शरीर निरोगी ठेवण्यासाठी काही सोप्या सवयीही सुचवल्या आहेत.
विमानप्रवासात शरीरावर नेमका काय परिणाम होतो? कार्डिओलॉजिस्टने दिल्या सोप्या पण महत्त्वाच्या टिप्स
विमानप्रवासात शरीरावर नेमका काय परिणाम होतो? कार्डिओलॉजिस्टने दिल्या सोप्या पण महत्त्वाच्या टिप्स'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

बहुतेक प्रवाशांसाठी विमानप्रवास म्हणजे फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा मार्ग असतो. मात्र प्रत्यक्षात आकाशात असताना आपल्या शरीरातील अनेक अवयवांवर मोठा ताण येत असतो. अमेरिकेतील हृदयविकार तज्ज्ञ डॉ. दिमित्री यारानोव (Dmitry Yaranov) यांनी सोशल मीडियावर विमानप्रवासादरम्यान शरीरात होणाऱ्या बदलांविषयी माहिती दिली आहे. त्यांच्या मते, उड्डाणादरम्यान शरीराला अनेक शारीरिक बदलांचा सामना करावा लागतो. यामुळे काही साध्या सवयी अंगीकारल्यास या परिणामांपासून स्वतःचे संरक्षण करता येते.

उड्डाणादरम्यान शरीरात होणारे बदल

डॉ. यारानोव यांनी सांगितले की, विमानात बसल्यानंतर अनेकांना जाणवणारा थकवा हा केवळ ‘जेट लॅग’ नसतो. उंचीवरील वातावरणामुळे शरीरात काही महत्त्वाचे शारीरिक बदल घडत असतात. विमानाच्या केबिनमध्ये दाब नियंत्रित झाल्यानंतर शरीर लगेचच त्या परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करतं.

विमानप्रवासात शरीरावर नेमका काय परिणाम होतो? कार्डिओलॉजिस्टने दिल्या सोप्या पण महत्त्वाच्या टिप्स
डबल चिनमुळे लूक बिघडतोय? ५ मिनिटांचे 'हे' व्यायाम करा, जॉ लाईन दिसेल शार्प

"बहुतेकांना वाटतं की विमानप्रवास म्हणजे फक्त आकाशात खुर्चीत बसून राहणं. पण प्रत्यक्षात तुमचं शरीर त्या वेळी मोठं काम करत असतं," असं ते म्हणाले.

फ्लाइटमध्ये शरीराला का येतो ताण?

• ऑक्सिजनची कमतरता :
केबिनमधील दाब कमी झाल्यामुळे रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण घटते.

• हृदयावर ताण :
शरीराच्या ऊतींना पुरेसा ऑक्सिजन पोहोचवण्यासाठी हृदयाला अधिक वेगाने आणि जोराने रक्त पंप करावे लागते.

• रक्त घट्ट होणे :
विमानातील हवा अत्यंत कोरडी असते. त्यामुळे श्वासोच्छ्वासाद्वारे शरीरातील पाणी कमी होते. यामुळे रक्ताची मात्रा घटते आणि ते अधिक घट्ट होते.

• रक्ताभिसरण मंदावणे :
दीर्घकाळ एकाच जागी बसल्यामुळे पायांमध्ये रक्त साचते. त्यामुळे पाय जड होणे किंवा सूज येणे अशी लक्षणे दिसू शकतात.

• रोगप्रतिकारशक्ती कमी होणे :
कोरड्या हवेमुळे श्वसनमार्गातील संरक्षणात्मक आवरण कोरडे पडते, त्यामुळे संसर्गाचा धोका वाढू शकतो.

विमानप्रवासात शरीराची काळजी कशी घ्यावी?

डॉक्टरांनी प्रवासादरम्यान हृदयाचे आरोग्य आणि रोगप्रतिकारशक्ती जपण्यासाठी काही सोप्या सवयी सांगितल्या आहेत.

विमानप्रवासात शरीरावर नेमका काय परिणाम होतो? कार्डिओलॉजिस्टने दिल्या सोप्या पण महत्त्वाच्या टिप्स
त्वचेवरील टॅनिंग कमी करा! १० रुपयांच्या बीटाने मिळवा नैसर्गिक गुलाबी ग्लो

१. आधीपासून पाणी प्या
विमानात बसल्यानंतरच पाणी पिण्याची वाट पाहू नका. प्रवास सुरू होण्यापूर्वीच शरीरात पुरेशी पाण्याची मात्रा असणे आवश्यक आहे.

२. मीठ आणि मद्यपान टाळा
विमानप्रवासादरम्यान मीठ आणि मद्यपान टाळण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. हे दोन्ही घटक शरीरातील पाण्याची कमतरता वाढवतात आणि रक्त अधिक घट्ट होण्यास कारणीभूत ठरतात.

३. दर तासाला थोडी हालचाल करा
दीर्घकाळ बसून राहिल्यामुळे रक्त पायांमध्ये साचू शकते. त्यामुळे दर तासाला उठून थोडं चालणं किंवा अंग ताणणं उपयुक्त ठरतं. विमानातून उतरल्यावर थोडं चालणंही रक्ताभिसरण सुरळीत करण्यास मदत करते.

४. नाकासाठी सॅलाइन स्प्रे वापरा
उड्डाणापूर्वी सॅलाइन नॅझल स्प्रे वापरल्यास श्वसनमार्गातील आर्द्रता टिकून राहते आणि संसर्गाचा धोका कमी होण्यास मदत होते.

डॉ. यारानोव यांच्या मते, "लहान सवयी मोठा फरक घडवू शकतात. तुमचं हृदयही तुमच्यासोबत प्रवास करत असतं, त्यामुळे त्याची योग्य काळजी घेणं आवश्यक आहे"

logo
marathi.freepressjournal.in