१५ मिनिटांत तयार करा हेल्दी छोले सलाड; वर्कआऊटनंतरचा परफेक्ट नाश्ता

दिवसाची सुरुवात पौष्टिक पदार्थाने केली तर शरीराला ऊर्जा मिळते आणि पोटही जास्त वेळ भरलेलं राहतं. खास करून वर्कआऊटनंतर लागलेली भूक भागवण्यासाठी छोले चण्यांचे सलाड हा उत्तम पर्याय ठरू शकतो.
१५ मिनिटांत तयार करा हेल्दी छोले सलाड; वर्कआऊटनंतरचा परफेक्ट नाश्ता
१५ मिनिटांत तयार करा हेल्दी छोले सलाड; वर्कआऊटनंतरचा परफेक्ट नाश्ता'एआय'ने बनविलेली प्रतिमा
Published on

धावपळीच्या जीवनशैलीत सकाळचा नाश्ता अनेकदा टाळला जातो किंवा बाहेरचं तेलकट अन्न पटकन खाल्लं जातं. मात्र दिवसाची सुरुवात पौष्टिक पदार्थाने केली तर शरीराला ऊर्जा मिळते आणि पोटही जास्त वेळ भरलेलं राहतं. खास करून वर्कआऊटनंतर लागलेली भूक भागवण्यासाठी छोले चण्यांचे सलाड हा उत्तम पर्याय ठरू शकतो.

चणे प्रथिने, फायबर आणि पोषक घटकांनी समृद्ध असतात. त्यामुळे हे सलाड खाल्ल्यानंतर दीर्घकाळ भूक लागत नाही आणि शरीराला आवश्यक ऊर्जा मिळते.

१५ मिनिटांत तयार करा हेल्दी छोले सलाड; वर्कआऊटनंतरचा परफेक्ट नाश्ता
केस आणि त्वचेसाठी उत्तम! भरपूर Vitamin C ने घरगुती आवळा कँडी रेसिपी; कमी साहित्य, जास्त फायदे

साहित्य

  • उकडलेले छोले (चणे)

  • बारीक चिरलेला कांदा

  • चिरलेला टोमॅटो

  • काकडी

  • किसलेले गाजर

  • किसलेले बीट

  • मक्याचे दाणे

  • लिंबाचा रस

  • चाट मसाला

  • काळीमिरी पावडर

  • मीठ

  • ऑलिव्ह ऑइल

  • बारीक चिरलेली कोथिंबीर

  • (ऐच्छिक) डाळिंबाचे दाणे

१५ मिनिटांत तयार करा हेल्दी छोले सलाड; वर्कआऊटनंतरचा परफेक्ट नाश्ता
जेवणात तोंडी लावायला झणझणीत भरलेली हिरवी मिरची; वरण-भाताची चव होईल दुप्पट

कृती

छोले चण्यांचे सलाड बनवण्यासाठी सर्वप्रथम रात्री भिजवलेले चणे स्वच्छ धुवून कुकरमध्ये घ्या. त्यात पाणी आणि चवीनुसार मीठ घालून साधारण ३ शिट्ट्या काढून चणे मऊ होईपर्यंत शिजवून घ्या. शिजल्यानंतर त्यातील अतिरिक्त पाणी गाळून चणे थंड होण्यासाठी बाजूला ठेवा. आता एका मोठ्या भांड्यात उकडलेले चणे घ्या आणि त्यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, काकडी, किसलेले गाजर व बीट तसेच मक्याचे दाणे घाला. त्यानंतर लिंबाचा रस, चाट मसाला, काळीमिरी पावडर आणि चवीनुसार मीठ टाकून सगळे साहित्य व्यवस्थित मिसळा. शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आवडत असल्यास डाळिंबाचे दाणे घाला. सर्व्ह करण्यापूर्वी वरून थोडे ऑलिव्ह ऑइल घालून पुन्हा एकदा हलक्या हाताने मिक्स करा. तयार आहे झटपट आणि पौष्टिक छोले चण्यांचे सलाड.

logo
marathi.freepressjournal.in