

डिसेंबर महिन्यात येणारा नाताळ सण म्हणजे जगभरातील ख्रिश्चन बांधवांसाठी प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मदिनाचा आनंदोत्सव. हा सण केवळ धार्मिक नाही तर प्रेम, दया, क्षमा आणि एकतेचा संदेश देणारा आहे. घराघरात झगमगणारे दिवे, सजलेले ख्रिसमस ट्री, भेटवस्तूंची देवाणघेवाण आणि प्रियजनांसोबतचा वेळ यामुळे वातावरण आनंदमय होऊन जाते. थंडीच्या दिवसांत हा सण उब आणि प्रेमाची अनुभूती देतो.
या नाताळाच्या निमित्ताने आपण सर्वजण एकमेकांना शुभेच्छा देऊन आनंद द्विगुणित करूया. खाली काही सुंदर मराठी शुभेच्छा संदेश, आणि कोट्स दिल्या आहेत, ज्या तुम्ही WhatsApp, Facebook मेसेजद्वारे प्रियजनांना पाठवू शकता.
आला नाताळ घेऊनी आनंद चहूकडे,
केलेल्या चुकांची माफी मागूया प्रभूकडे,
मनात धरूया आशा, सर्व सुखी राहू दे,
प्रभूची कृपा-दृष्टी आपल्यावर नेहमी राहू दे…
नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!
...................................
स्नेहाचा सुगंध दरवळला, आनंदाचा सण आला,
विनंती आमची येशूला, सौख्य-समृद्धी लाभो तुम्हाला…
मेरी ख्रिसमस!
...................................
मदर मेरीच्या पोटी जन्मला येशू बाळ,
आनंद दिला जगाला, साजरा होतोय नाताळ…
तुम्हाला व कुटुंबीयांना ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा!
...................................
नाताळाचा सण, सुखाची उधळण!
होऊ दे तुमच्यावर प्रेमाची बरसात…
मेरी ख्रिसमस आणि हार्दिक शुभेच्छा!
...................................
झाडावर लखलखणाऱ्या ताऱ्यांसारखा,
तुमच्या जीवनात आनंद दरवळो!
येशू ख्रिस्तांचा आशीर्वाद नेहमी तुमच्यासोबत राहो…
नाताळच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
...................................
तुमच्यासाठी सांता आनंद, समृद्धी आणि यश घेऊन येवो,
मनातल्या सर्व इच्छा पूर्ण करो…
मेरी ख्रिसमस!
...................................
हिमाचा थंडगार स्पर्श आणि प्रेमाचा उबदारपणा,
नाताळच्या सणात मनात फुलो आनंदसरी…
तुम्हाला आणि कुटुंबीयांना हार्दिक शुभेच्छा!
...................................
यंदाचा नाताळ आणि येणारे नवीन वर्ष
सुख, शांती आणि समृद्धी घेऊन येवो…
मेरी ख्रिसमस!
या शुभेच्छा तुम्ही आपल्या मित्रांना, कुटुंबीयांना पाठवून त्यांचा दिवस खास बनवा. प्रभू येशूची कृपा सर्वांवर राहो!तुम्हा सर्वांना आणि तुमच्या कुटुंबीयांना नाताळच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा! मेरी ख्रिसमस!