कामाच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये अनेक महिला आपल्या त्वचेची योग्य काळजी घेण्यात मागे पडतात. अपुरी झोप, मानसिक तणाव, जंक फूड, तिखट आणि तेलकट पदार्थांचे जास्त सेवन या सगळ्यामुळे शरीरासह त्वचासुद्धा परिणामित होते. विशेषतः डोळ्यांखाली आलेले काळे डाग किंवा डोळ्यांखालील काळी वर्तुळे त्वचेचे सौंदर्य कमी करतात आणि चेहरा निस्तेज, थकलेला दिसतो. हार्मोनल बदलांमुळे चेहर्यावर पिगमेंटेशन आणि डार्क स्पॉट्स वाढत जातात.
बाजारातील क्रीम, लोशन किंवा सीरम काही दिवसांपुरते चमक आणतात, पण नैसर्गिक ग्लो टिकवण्यासाठी घरगुती उपाय अधिक प्रभावी ठरतात. त्यातच बटाटा हा एक उत्कृष्ट नैसर्गिक पर्याय आहे. बटाट्यामध्ये असलेला नैसर्गिक थंडावा डोळ्यांभोवती उष्णता कमी करण्यास मदत करतो आणि त्वचेला नैसर्गिक चमक देतो. बटाटा नॅचरल ब्लिचिंग एजंट म्हणून ओळखला जातो, ज्यामुळे त्वचेवरील डार्क स्पॉट्स आणि पिगमेंटेशन कमी होतो.
एका वाटीत तांदळाचे पीठ घ्या.
त्यात चिमूटभर हळद आणि थोडा बटाट्याचा रस मिसळून गुळगुळीत पेस्ट तयार करा.
तयार पेस्ट संपूर्ण चेहऱ्यावर आणि मानेवर लावा.
काही मिनिटे तसेच राहू द्या.
नंतर हातांवर पाणी लावून हलक्या हाताने मसाज करा.
या फेसपॅकमुळे डेड स्किन दूर होते, त्वचा उजळते, डार्क स्पॉट्स कमी होतात आणि चेहरा नैसर्गिकरित्या तेजस्वी दिसतो. बटाटा आणि तांदळाचा नैसर्गिक फेसपॅक नियमित वापरल्यास त्वचेची गुणवत्ता सुधारते आणि त्वचा अधिक निरोगी व चमकदार होते.
(Disclaimer: या माहितीमध्ये दिलेले आरोग्यविषयक सल्ले सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. याची ‘नवशक्ति’ पुष्टी करत नाही.)