लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या आवडीचा देसी स्टाईल 'पास्ता'

पास्ता म्हटलं की लगेचच डोळ्यांसमोर इटालियन डिश येते. पण आपल्या घरच्या स्वयंपाकघरात, थोडा देसी टच आणि सोप्या पद्धतीने बनवलेला पास्ता त्याहूनही जास्त मजेदार ठरतो.
लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या आवडीचा देसी स्टाईल 'पास्ता'
लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या आवडीचा देसी स्टाईल 'पास्ता'
Published on

पास्ता म्हटलं की लगेचच डोळ्यांसमोर इटालियन डिश येते. पण आपल्या घरच्या स्वयंपाकघरात, थोडा देसी टच आणि सोप्या पद्धतीने बनवलेला पास्ता त्याहूनही जास्त मजेदार ठरतो. लहान मुलांसह मोठ्यांनाही आवडणारा हा पदार्थ कमी वेळेत बनतो आणि स्वादाने बाजारातील रेस्टॉरंटसारखा लागतो.

साहित्य :

  • १ कप पास्ता

  • तेल किंवा बटर

  • १ कांदा (बारीक चिरलेला)

  • १ टोमॅटो (बारीक चिरलेला)

  • १ गाजर (किसलेले)

  • ½ कप ढोबळी मिरची (चिरलेली)

  • ½ कप मटार

  • १ चमचा आले-लसूण पेस्ट

  • १ चमचा लाल तिखट

  • ½ चमचा हळद

  • गरम मसाला

  • २ चमचा टोमॅटो सॉस

  • ½ चमचा मिरपूड पूड

  • चवीनुसार मीठ

  • २ कप पाणी

  • किसलेले चीज

लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या आवडीचा देसी स्टाईल 'पास्ता'
Mixed Vegetable Recipe : घरच्या घरी बनवा रेस्टॉरंटसारखी स्वादिष्ट मिक्स व्हेजिटेबल भाजी!

कृती :

सर्वप्रथम, कुकरमध्ये १ चमचा तेल किंवा बटर गरम करा. त्यात बारीक चिरलेला कांदा घालून सोनेरी होईपर्यंत परतवा. नंतर त्यात १ टीस्पून आले-लसूण पेस्ट घालून छान परतून घ्या. त्यानंतर १ टोमॅटो, १ गाजर, ½ कप मटार आणि ½ कप ढोबळी मिरची घालून २ मिनिटे शिजवा. यानंतर ½ चमचा हळद, १ चमचा लाल तिखट, १ चमचा गरम मसाला आणि ½ चमचा मिरपूड पूड घालून मिक्स करा.

कुकरमध्ये १ कप पास्ता, चवीनुसार मीठ आणि २ कप पाणी टाकून ढवळा. झाकण लावून २ शिट्या येऊ द्या. प्रेशर निघाल्यानंतर २ चमचा टोमॅटो सॉस टाका आणि वरून किसलेले चीज घालून गरमागरम सर्व्ह करा.

टिप: हवे असल्यास थोडेसे बटर किंवा फ्रेश क्रीम घालल्यास पास्ता आणखी क्रीमी आणि रिच लागतो.

logo
marathi.freepressjournal.in