
रोज रोज तीच भाजी-चपाती खाऊन कंटाळा आला आहे का? रेस्टॉरंटसारखं चमचमीत काही ट्राय करायचं मन होतंय का? मग ही मिक्स व्हेजिटेबल रेसिपी तुमच्यासाठी एकदम परफेक्ट! बनवायला अगदी सोपी आणि घरच्या साध्या साहित्याने पौष्टिक जेवण तयार होईल. रोजच्या आहारात रंगत, चव आणि पोषण वाढवण्यासाठी ही डिश एक उत्तम पर्याय आहे.
साहित्य :
१ कोबी
१ कांदा
२ टोमॅटो
अर्धा कप वाटाणे
अर्धा कप मशरूम
१ गाजर
घेवडा
१ सिमला मिरची
सुके मसाले (चवीनुसार)
तेल (गरजेनुसार)
मीठ (चवीनुसार)
१०० ग्रॅम दही
१०० ग्रॅम पनीर
कसुरी मेथी (चवीनुसार)
सर्वप्रथम एका मोठ्या भांड्यात कोबी, वाटाणे आणि घेवडा उकळवा. भाज्या शिजल्यावर पाण्यातून काढून वेगळ्या भांड्यात ठेवा. इतर भाज्या चिरून घ्या – सिमला मिरची, मशरूम, गाजर आणि पनीर, तर कांदा बारीक चिरून ठेवा. आता गॅस चालू करून एका पॅनमध्ये तेल गरम करा. त्यात लवंग, दालचिनीची काडी, तमालपत्र आणि वेलची टाका. बारीक चिरलेला कांदा घालून सोनेरी होईपर्यंत परता. त्यानंतर उकडलेल्या आणि चिरलेल्या भाज्या पॅनमध्ये टाका आणि भाजी झाकून काही मिनिटे शिजू द्या. टोमॅटो चिरून ग्राइंडरमध्ये टाका, त्यात लाल तिखट, धणे पूड, गरम मसाला, दही आणि हळद घालून बारीक वाटून घ्या. तयार मसाला भाज्यांमध्ये घालून नीट ढवळा, चवीनुसार मीठ टाका आणि भाजी ५ मिनिटे झाकून शिजू द्या. शेवटी वरून हिरवी कोथिंबीर गार्निश करा. गरम पोळ्यांसोबत ही मिक्स व्हेजिटेबल भाजी सर्व्ह करण्यास तयार आहे!