हेल्दीही अन् टेस्टीही! मोड आलेल्या मुगाचं बिरडं, आजच ट्राय करा ही सोपी रेसिपी

मोड आलेली कडधान्य म्हणजे पौष्टिकतेचा खजिना असतात आणि त्यांची चवही खास लागते. म्हणूनच आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत चवदार आणि आरोग्यदायी मोड आलेल्या मुगाचं बिरडं. जे एकदा खाल्लं की पुन्हा नक्की बनवाल.
हेल्दीही अन् टेस्टीही! मोड आलेल्या मुगाचं बिरडं, आजच ट्राय करा ही सोपी रेसिपी
Published on

आजकाल बहुतेक जण आरोग्याची काळजी घेत आपल्या आहारात बदल करत आहेत. फॅन्सी डाएटपेक्षा घरच्या घरी मिळणारे साधे, पण पौष्टिक पदार्थच जास्त आवडतात. त्यात कडधान्यं तर आपल्या रोजच्या जेवणाचा भाग असतातच, कारण ती पोषणमूल्यांनी भरलेली असतात. त्यातही मोड आलेली कडधान्य म्हणजे पौष्टिकतेचा खजिना असतात आणि त्यांची चवही खास लागते. म्हणूनच आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत चवदार आणि आरोग्यदायी मोड आलेल्या मुगाचं बिरडं. जे एकदा खाल्लं की पुन्हा नक्की बनवाल.

साहित्य :

½ वाटी मूग (मोड आणलेले)

4 लसणाच्या पाकळ्या (ठेचलेल्या)

ओलं नारळ (खवलेलं)

2 चमचे गरम मसाला

2 कोकमी आमसूल

2 कांदे (बारीक चिरलेले)

1 लहान चमचा हळद

2-3 हिरव्या मिरच्या (बारीक चिरलेल्या)

बारीक चिरलेली कोथिंबीर

जिरं

तेल

हेल्दीही अन् टेस्टीही! मोड आलेल्या मुगाचं बिरडं, आजच ट्राय करा ही सोपी रेसिपी
नुसतं बीट खायचा कंटाळा आलाय? मग ‘या’ बीटाच्या रेसिपीज ट्राय करा; चवही येईल आणि आरोग्यही टिकेल!

कृती :

सर्वप्रथम मूग भिजवून त्याला मोड आणा. इच्छेनुसार तुम्ही मुगाची साल काढू शकता. या मुगामध्ये हळद, लसूण, मीठ आणि गरम मसाला घालून चांगले मिसळा. तर दुसरीकडे कढईत तेल गरम करून त्यात जिरे, हिरवी मिरची आणि कांदा घालून परता. कांदा शिजू लागला की त्यात मूग घाला. थोडंसं पाणी टाकून शिजू द्या. मग त्यात खवलेलं ओलं नारळ आणि आमसूल घालून झाकण ठेवून शिजवा. शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून गरमागरम सर्व्ह करा.

logo
marathi.freepressjournal.in