डिजिटल पेमेंट करणंही मुलींसाठी धोकादायक? सुरक्षेसाठी करा 'हे' उपाय

डिजिटल पेमेंटमधून फोन नंबर उघड होऊन मुलींचा पाठलाग व ऑनलाइन छळ वाढत असल्याने सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. GPay, PhonePe किंवा QR स्कॅनद्वारे पैसे देणेही धोकादायक ठरू लागले असून अशा घटनांपासून वाचण्यासाठी मुलींनी काही आवश्यक डिजिटल सेफ्टी नियम पाळणे अत्यावश्यक बनले आहे.
डिजिटल पेमेंट करणंही मुलींसाठी धोकादायक? सुरक्षेसाठी करा 'हे' उपाय
Published on

मुंबईसह देशभरात डिजिटल पेमेंटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असला, तरी त्याचबरोबर काही संतापजनक घटना समोर येत आहेत. QR कोडद्वारे ऑटो भाडे किंवा दुकानातील बिल भरताना मुलींचे फोन नंबर हाती मिळवून त्यांचा पाठलाग करणाऱ्या आणि सोशल मीडियावर मेसेज करून त्रास देणाऱ्या प्रसंगांची संख्या वाढू लागली आहे. मीरा रोडमध्ये घडलेली एका अल्पवयीन मुलीची घटना तर समाजातील मुलींच्या असुरक्षेची गंभीरता दर्शवते.

GPay पेमेंटमधून नंबर मिळवून ऑटोचालकाने तिचा इंस्टाग्राम आयडी शोधला. तिला मेसेज करुन तिला त्रास देण्याचा प्रकार धक्कादायकच होता. अशा घटना केवळ डिजिटल वापरातील निष्काळजीपणामुळेच नव्हे, तर ऑनलाईन सुरक्षेबद्दलची कमतरता यामुळे घडत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. मात्र, काही साध्या पण अत्यंत महत्त्वाच्या उपाययोजनांनी मुली-महिलांना अशा परिस्थितींना सामोरे जाण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर कमी करता येते. त्यासाठी महिलांसाठी डिजिटल पेमेंटपासून सोशल मीडिया सेटिंग्जपर्यंतच्या आवश्यक सुरक्षा टिप्स जाणून घेऊया.

डिजिटल पेमेंट करणंही मुलींसाठी धोकादायक? सुरक्षेसाठी करा 'हे' उपाय
Mumbai : रिक्षाचालकाचा संतापजनक प्रकार; GPay नंबरवरून मुलीचा पाठलाग, इंस्टाग्रामवर मेसेज, स्थानिकांनी दिला चोप|Video

१. डिजिटल पेमेंट करताना सुरक्षितता

डिजिटल व्यवहार करताना सर्वात मोठा धोका म्हणजे तुमचा फोन नंबर समोरच्या व्यक्तीला दिसणे. तो टाळण्यासाठी :

  • QR कोड स्कॅन करूनच पेमेंट करा; “Send Money” मध्ये नंबर टाकणे टाळा.

  • स्वतंत्र UPI ID तयार करा (उदा. tumhanaam@oksbi), जेणेकरून व्यवहारात तुमचा नंबर दिसणार नाही.

  • Request Money करून घ्या - ऑटोवाला किंवा दुकानात पैसे मागण्याची विनंती करायला सांगा; यात नंबर उघड होत नाही.

  • ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट लगेच घ्या आणि GPay/PhonePe चॅट डिलीट करा.

२. सोशल मीडिया सेटिंग्ज सुरक्षित ठेवा

छळ करणारे अनेकदा नंबरद्वारे इंस्टाग्राम/फेसबुक प्रोफाइल शोधतात. त्यामुळे:

  • प्रोफाईल प्रायव्हेट ठेवा.

  • Instagram/Facebook वर “Who can find me by phone number → Nobody” सेट करा.

  • अनोळखी लोकांचे मेसेज 'Request' मध्ये जातील आणि थेट DM मध्ये येणार नाहीत.

३. रात्री किंवा एकटी असताना प्रवास करताना आवश्यक काळजी

  • ऑटो/कॅबमध्ये बसल्यावर नंबर प्लेटचा फोटो काढून घरी किंवा मित्राला WhatsApp करा.

  • Share Live Location १५–२० मिनिटांसाठी शेअर करा.

  • bSafe, Safetipin, VithU, 112 India सारख्या Women Safety Apps उपयोगी ठरतात.

  • ११२ हा राष्ट्रीय आपत्कालीन क्रमांक तात्काळ मदत देणारा आहे. तो सेव्ह ठेवा.

४. छळ सुरू झाल्यास तातडीने कृती करा

  • मेसेज/प्रोफाईल/व्हिडीओचे स्क्रीनशॉट घ्या.

  • कुटुंबीय किंवा मित्रांना त्वरित सांगा.

  • Cyber Cell ला तक्रार करा – cybercrime.gov.in

  • धोका वाढत असल्यास १०० किंवा ११२ वर त्वरित कॉल करा.

  • FIR नको असली तरी NCO (Non-Cognizable Complaint) नोंदवता येते.

५. रोजच्या प्रवासातील सवयी

  • रात्री ८ नंतर शक्यतो शेअर ऑटो किंवा Ola/Uber वापरा.

  • ऑटोमध्ये मागे बसा, शक्य असल्यास दरवाजा लॉक करा.

  • घराजवळ पोहोचल्यावर ऑटोतून थेट सोसायटीसमोर न उतरणे - ५०–१०० मीटर आधी उतरणे अधिक सुरक्षित.

थोडी काळजी - ९०% धोके कमी

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, या छोट्या उपाययोजना अवलंबल्यास बहुतेक डिजिटल किंवा सोशल मीडिया आधारित छळाच्या घटना टाळता येऊ शकतात. समाजातील महिलांनी सतर्क राहणे, तांत्रिक सुरक्षितता उपायांचे पालन करणे आणि धोक्याची शक्यता दिसताच तक्रार करण्यास मागे न हटणे ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे. कधीही धोका वाटला तर ११२ वर फोन करा. कारण तुमची सुरक्षा हीच सर्वात महत्त्वाची!

logo
marathi.freepressjournal.in